एक्स्प्लोर

आण्णाभाऊंच्या 'आवडी'चा वाद कोर्टात, 'इभ्रत'च्या प्रदर्शनाला ब्रेक

साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या 'आवडी' कथेवर आधारित इभ्रत हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शिक होणार होता. परंतु कथेच्या हक्काचा वाद कोर्टात गेला आहे.

मुंबई : आण्णाभाऊ साठे हे काळापुढचे साहित्यिक होते. म्हणूनच त्यांच्या साहित्यकृतीची भुरळ आजही अनेक सिनेनिर्मात्यांना पडते. खरंतर त्यांच्या आवडी या कथेवर बेतलेला 'इभ्रत' हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. पण या कथेच्या हक्कांवरुन नव्याने वाद उद्भवला आहे. तो वाटाघाटींनी सोडवता न आल्याने आता हा वाद कोर्टात गेला आहे.

'इभ्रत' हा चित्रपट आण्णाभाऊ साठे यांच्या 'आवडी' या कथेवर बेतलेला आहे. प्रवीण क्षीरसागर दिग्दर्शित या चित्रपटात संजय शेजवल आणि शिल्पा ठाकरे यांच्या भूमिका आहेत. सिनेमाचं प्रमोशनही आता जोर धरु लागलं होतं. तोवर कथेच्या हक्कांवरुन सतीश वाघेला यांनी या सिनेमाच्या निर्मात्यांना कोर्टात खेचलं आहे. वाघेला यांच्या मते 'आवडी' या कथेचे हक्क आण्णाभाऊ यांच्या सून सावित्रीमाई साठे यांनी त्यांना दिले आहेत. तर 'इभ्रत'च्या निर्मात्यांचा मात्र हे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. याबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले, 'हा वाद आता यायाचं कारण नव्हतं. आमच्या निर्मात्याकडे या सिनेमाचे हक्क आहेत. सावित्री यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. असं असताना वाघेला यांनी या कथेचे हक्क आपल्याकडे असल्याचं सांगणं अनाकलनीय आहे. सावित्री यांनी त्यांनाही एका कथेचे हक्क दिले आहेत पण ती कथा वेगळी आहे. असो. सध्या हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे कोर्ट या सर्व प्रकाराची शहानिशा करुन निर्णय देईल.''

या वादाबाबत 21 तारखेलाच कोर्ट सुनावणी करणार आहे. त्यामुळे या शुक्रवारी म्हणजे 21 फेब्रुवारीला असलेलं या सिनेमाचं प्रदर्शन आता पुढे ढकलण्यात येणार आहे. कोर्टाचा निकाल जर 'इभ्रत'च्या बाजूने लागला तर आता हा चित्रपट मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शुक्रवारी प्रदर्शित करायचा विचार निर्माते करत आहेत.

वादामुळे नुकसान या कोर्टातल्या वादामुळे निर्मात्यांना निष्कारण 25 ते 30 लाखांचं नुकसान झाल्याचा दावा दिग्दर्शक करतात. सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सिनेमा वितरकांना पैसे द्यावे लागतात. तरच सिनेमा वितरित होऊ शकतो. शिवाय सर्व माध्यमांत जाहिरात करावी लागते. त्यावर खर्च करुनही सिनेमा पुढे गेल्याने आता पुढे जेव्हा सिनेमाची तारीख ठरेल तेव्हा पुन्हा हा खर्च करावा लागणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KKR ची फायनलमध्ये धडक, कर्णधार श्रेयस अय्यरच्या आनंदाला पारवार नाही, म्हणाला....

कोलकात्याची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा आठ विकेटने पराभव, श्रेयस अय्यर-वेंकटेश अय्यरची अर्धशतके

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 22 मे पासून प्रवेश सुरू, 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी

हेड-अभिषेक फ्लॉप, राहुल त्रिपाठीनं एकट्यानं हैदराबादला सावरलं, पण धावबाद झाल्यानंतर अश्रू अनावर
हेड-अभिषेक फ्लॉप, राहुल त्रिपाठीनं एकट्यानं हैदराबादला सावरलं, पण धावबाद झाल्यानंतर अश्रू अनावर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Daughter-Mother HSC Result : डोळ्यात स्वप्न, मनात जिद्द; आईनं लेकीसह दिली 12वी, दोघींनी मारली बाजी!Zero Hour Marathwada Drought :घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण, दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळणार?Vishal Agarwal Father:विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी  संबंध, खुनाच्या प्रयत्नाचा होता गुन्हाMarathwada Water Crisis Special Report : मराठवाड्याची तहान टँकरला टांगली, पाणी प्रश्न सुटणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KKR ची फायनलमध्ये धडक, कर्णधार श्रेयस अय्यरच्या आनंदाला पारवार नाही, म्हणाला....
KKR ची फायनलमध्ये धडक, कर्णधार श्रेयस अय्यरच्या आनंदाला पारवार नाही, म्हणाला....
कोलकात्याची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा आठ विकेटने पराभव, श्रेयस अय्यर-वेंकटेश अय्यरची अर्धशतके
कोलकात्याची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा आठ विकेटने पराभव, श्रेयस अय्यर-वेंकटेश अय्यरची अर्धशतके
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 22 मे पासून प्रवेश सुरू, 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 22 मे पासून प्रवेश सुरू, 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी
हेड-अभिषेक फ्लॉप, राहुल त्रिपाठीनं एकट्यानं हैदराबादला सावरलं, पण धावबाद झाल्यानंतर अश्रू अनावर
हेड-अभिषेक फ्लॉप, राहुल त्रिपाठीनं एकट्यानं हैदराबादला सावरलं, पण धावबाद झाल्यानंतर अश्रू अनावर
सहायक पोलिस आयुक्तांच्या घरावर धाड, एसीबीने शोधून काढलं घबाड; 10 ठिकाणी छापे

चंद्रकांत पाटील थेट थंडगार महाबळेश्वरला, पत्नीसमवेत लेदरची खरेदी; निवडणुकीच्या गरमा-गरमीतून अल्हादायक गारवा

उजनी धरणात बोट पलटली, 6 जण बुडाले, PSI पोहत-पोहत काठावर आले; रात्रीच्या अंधारात शोध सुरू

स्टार्कपुढे हैदराबादच्या फलंदाजांची दाणादाण, कोलकात्याला विजयासाठी 160 धावांचे माफक आव्हान

Embed widget