Hruta Durgule Upcoming Play : 'या' नाटकात ऋता करणार अभिनय, निर्मिती आणि गायन सुद्धा!
Hruta Durgule Upcoming Play : आरपार नंतर ऋता दिसणार या नाटकात! तिच सहनिर्माती, तिच गायिका आणि तिच अभिनेत्री

Hruta Durgule Upcoming Play : 'ठरलंय फॉरएवर' हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एवढंच नाहीतर अनेक रोचक गोष्टींचा उलगडा या नाटकातून व्हायचा बाकी आहे, जसं की, या नाटकाची गाणी ऋता दुर्गुळे हीनंच गायली आहेत. तीच या नाटकात मुख्य भूमिकासुद्धा साकारणार आहे. प्रेम, आठवणी आणि नव्या सुरुवातींचं वचन देणारं हे नाटक मराठी रंगभूमीवर एक वेगळा अनुभव घेऊन येत आहे. 'ठरलंय फॉरएवर' हे नाटक नावातच उबदार भावना घेऊन येतं. संगीत, अभिनय आणि मॉडर्न टेकनिक्स यांचा सुंदर संगम या नाटकाला खास बनवतो. प्रत्येक दृश्य आणि गाण्यात एक वेगळा अनुभव आहे, जी प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या जोडतो.
ठरलंय फॉरएवर फक्त नाटक नाही, ती एक भावना आहे : ऋता
या नाटकाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यात या प्रवासाची सुरुवात झाली. ऋता दुर्गुळे, कपिल रेडकर, अक्षता आचार्य, ऋषी मनोहर आणि संगीतकार अनिरुद्ध निमकर यांनी मराठी थिएटरला नव्या युगात नेण्यासाठी ही मेहनत घेतली आहे. अभिनेत्री आणि सहनिर्माती ऋता दुर्गुळे म्हणाली, "हे नाटक म्हणजे सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. प्रत्येकाने मनापासून काम केलं आहे. ठरलंय फॉरएवर आमच्यासाठी फक्त नाटक नाही, ती एक भावना आहे"
'ठरलंय फॉरएवर'ची संकल्पना काय?
दिग्दर्शक ऋषी मनोहर यांनी सांगितले, "थिएटरमध्ये नवा अनुभव, नवी दृश्यभाषा आणि नवा सूर शोधायचा होता. लाईव्ह गाणी, एलईडी पार्श्वभूमी आणि आधुनिक कथनशैली या तिन्हींच्या संगमातून 'ठरलंय फॉरेवर' जन्माला आलं. प्रेक्षकांना फक्त नाटक नव्हे, तर एक संगीतमय अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे." या नाटकाला संगीत अनिरुद्ध निमकर यांनी दिलं आहे आणि गाणी स्वतः ऋता दुर्गुळे आणि कपिल रेडकर यांनी गायली आहेत. कलाकारच गातात, अभिनय करतात आणि भावना साकार करतात. हीच या नाटकाची खासियत आहे.
हे नाटक सर्वांसाठी...
ठरलंय फॉरेवर हे फक्त तरुणांसाठी नाही तर मुलांपासून आजीआजोबांपर्यंत प्रत्येकाला भावेल. त्याची भाषा साधी, जिवंत आणि आजच्या पिढीशी जोडणारी आहे. वाइड विंग्स मीडियाची निर्मिती असलेलं हे नाटक 18 ऑक्टोबरपासून रंगभूमीवर सादर होणार आहे. कदाचित याच नाटकातून मराठी थिएटरचा सूर बदलणार आहे आणि प्रेक्षकांना नवे अनुभव घेण्याची संधी निर्माण होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :























