एक्स्प्लोर

Kajalmaya Marathi Serial : चेटकीण, तंत्रविद्या आणि थरार, काजळमाया मालिकेतून प्रिया बेर्डेंची पु्न्हा एन्ट्री

Kajalmaya Marathi Serial : स्टार प्रवाहवर 'सांग तू आहेस का?' यानंतर 2 वर्षांनी एक हॉरर मालिका पाहायला मिळणार. काजळमाया असं या मालिकेचं नाव आहे.

Kajalmaya Marathi Serial :  मालिकाविश्वात आणखी एक रहस्यमय आणि थरारक मालिका येत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर काजळमाया ही मालिका पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार आहेत. येत्या 27 ऑक्टोबरपासून ही मालिका प्रसारित होणार आहे. मालिकेच्या अनाउंसमेंटच्या निमित्ताने 14 ऑक्टोबर रोजी स्टार प्रवाहतर्फे एका  पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्टार प्रवाहचे सीईओ सतिश राजवाडे, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार उपस्थित होते.

मालिकेची कहाणी नेमकी काय?

सतिश राजवाडे यांनी सांगितले की, "काजळमाया हे नाव ऐकतानाच भीतीदायक वाटतं.  मालिकेची कथा देखील तितकीच रहस्यमय आणि थरारक आहे. ही मालिका प्रेक्षकांसाठी एक धक्कातंत्र ठरेल. प्रत्येक भागानंतर आता पुढे काय होणार हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण व्हावा, उत्सुकता ताणली जावी, हेच आमचं ध्येय आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

पर्णिकाच्या भूमिकेत कोण?

चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट म्हणजेच काजळमाया ही मालिका. या मालिकेतून रुची जाईल ही प्रथमच पदार्पण करत आहे. रुची नुकतीच श्रावण क्वीन स्पर्धेची विजेती ठरली असून ती तिच्या पहिल्यावहिल्या मालिकेसाठी अतिशय उत्सुक आहे. तिच्यासोबत अक्षय केळकर आणि वैष्णवी कल्याणकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि प्रिया बेर्डे हे देखील एका वेगळ्या भूमिकेत दिसतील.

हॉरर प्रकारातील ही पहिली मोठी मालिका

'सांग तू आहेस का?' या मालिकेनंतर स्टार प्रवाहवर हॉरर प्रकारातील ही पहिली मोठी मालिका असणार आहे. त्यामुळे काजळमाया प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडेल असा विश्वास संपूर्ण टीमला आहे.

मालिका प्रेक्षकांसाठी धक्कातंत्र असेल : राजवाडे

सतीश राजवाडे पुढे म्हणाले की "ही मालिका प्रेक्षकांसाठी एक धक्कातंत्र असणार आहे, मालिका पाहत असताना उद्या काय होईल हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात यायला हवा, या सर्व बाबी लक्षात घेऊन मालिकेवर काम करण्यात येईल. मला या पूर्ण टीमचं कौतुक करायचंय, आपण कित्येक मालिकांचं सादरीकरण पाहतो पण एखाद्या मालिकेचं याप्रकारे केलेलं सादरीकरण (curtain raisal) म्हणजे खरच आश्चर्याची गोष्ट आहे. आपण क्वचीतच अशा गोष्टी पाहतो, अशा प्रकारे लॉन्च इव्हेंट करण्यात येईल मलाही माहिती नव्हतं हे माझ्यासाठीही एक धक्कातंत्र होतं, या सादरीकरणामुळे मालिकेचा जॉनर काय असणार आहे हे खूप छान प्रकारे रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलंय असं मला वाटतं"

 Kajalmaya star pravah new serial VIDEO :  

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Embed widget