Shehnaaz Gill : ट्रेनरच्या मदतीशिवाय शहनाझने वजन कसं कमी केलं? शिल्पाच्या चॅट शोमध्ये अभिनेत्रीनं उलगडलं रहस्य!
Shehnaaz Gill : शहनाजने शिल्पा शेट्टीच्या ‘शेप ऑफ यू’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये ती वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबतही मोकळेपणाने बोलली.
Shehnaaz Gill : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) मृत्यूनंतर शहनाज गिलला (Shehnaaz Gill) वाटले की, आपले संपूर्ण जगच संपले आहे. यानंतर तिने काम करणे बंद केले होते. तसेच, तिच्या चेहऱ्यावरील पूर्वीसारखे हास्य देखील नाहीसे झाले होते. आता अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या जुन्या आयुष्यात परतण्याचा प्रयत्न करत आहे. तिने पुन्हा एकदा कमला सुरुवात केली आहे, ती आनंदी राहू लागली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूच्या काही महिन्यांनंतर, मित्राच्या लग्नात शहनाज दिसल्यावर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. मात्र, त्यामुळे शहनाजला काही फरक पडला नाही.
अभिनेत्री म्हणते की, सिद्धार्थने मला कधीच सांगितले नाही की, तू हसू नकोस, आनंदी राहू नकोस. उलट मी आनंदी रहावे, असे सिद्धार्थला नेहमी वाटत असे. या सर्व गोष्टींचा खुलासा शहनाजने शिल्पा शेट्टीच्या ‘शेप ऑफ यू’ या शोमध्ये केला होता. या शोमध्ये ती वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबतही मोकळेपणाने बोलली.
ट्रेनरच्या मदतीशिवाय शहनाझने वजन कसं कमी केलं?
यावेळी शहनाजने ट्रेनरच्या मदतीशिवाय शहनाझने वजन कसं कमी केलं? याबद्दल सांगितलं. शहनाज गिलने सांगितले की, या प्रवासादरम्यान तिने तेच पदार्थ खाल्ले, जे ती पूर्वी खात होती. तिला वाटायचे की, बॉलिवूड अभिनेत्री किती भाग्यवान आहेत, त्यांच्याकडे वैयक्तिक प्रशिक्षक आहेत, माझ्याकडे मात्र तसं काहीच नाही. शहनाज म्हणाली की, घरात राहूनही प्रत्येकजण फिट राहू शकतो.
शहनाझचा फिटनेस फंडा!
वेटलॉस जर्नीबद्दल सांगताना शहनाझ म्हणते, बाहेर फिरायला जाऊ शकत नसाल, तर घरीच फिरा. तुम्ही तुम्हाला जे हवं ते करू शकता. सलवार सूटमध्येही तुम्ही फिट दिसू शकता. डाएटबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, यादरम्यान तिने कोणताही वेगळा डाएट घेतलेला नाही. सकाळी ती चहा प्यायची, हळदीचे पाणी प्यायची. त्यानंतर शहनाज अॅपल सायडर व्हिनेगरचे पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करायची. तसेच, ती कधी कधी नाश्त्यात डोसा, मेथी पराठा खायची. शहनाज म्हणाली की, वजन कमी करण्यासाठी ती हाय प्रोटीन नाश्ता करायची. यावेळेत तिने फक्त तिने जेवण काहीसं कमी केलं होतं.
हेही वाचा :
- ABP Ideas of India : फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला...
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, 'दफा कर'ची चाहत्यांमध्ये क्रेझ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha