एक्स्प्लोर
ट्वीस्ट, टर्न्स अन् चक्रावणाऱ्या थ्रिलर फिल्म्स पाहायला आवडतात? 'या' फिल्म्स डोकं भंडावून सोडतील
OTT release this week: थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही दिवसांत किंवा थेट OTTवर प्रीमियर होणारे चित्रपट आता प्रेक्षकांच्या घरी पोहोचत आहेत.
OTT release
1/12

तुम्हालाही थ्रिलर फिल्म्स पाहायला आवडतात का? या आठवड्यात OTT वर अनेक साऊथ ट्विस्टन्स आणि चक्रवणारे चित्रपट पाहायला मिळणार आहेत .
2/12

zee 5, नेटफ्लिक्स तसेच प्राईम video व सोनी TV वर या आठवड्यात काही अफलातून साउथ इंडियन थ्रिलर चित्रपट पाहायला मिळणार आहे .
3/12

साउथ सुपरस्टार शिवकार्तिकेयन आणि दिग्दर्शक A.R मुरुगदोस यांच्या जोडीने साकारलेला 'मधरासी ' प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या सायकॉलॉजिकल ॲक्शन थ्रिलर आता प्रेक्षकांसाठी प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम झाला आहे .
4/12

या चित्रपटात फ्रेगोली डिल्यूजन सारख्या दुर्मिळ मानसिक आजाराच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी कथा मांडण्यात आली आहे .थरार ड्रामा आणि ॲक्शन चा धमाकेदार मेळ घालणाऱ्या या सिनेमात अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे . हा चित्रपट अनेक भाषांमध्येही उपलब्ध आहे .
5/12

' The Game : you never play Alone ' हा दमदार सायकॉलॉजिकल थ्रिलर आता थेट नेटफ्लिक्स वर उपलब्ध झाला आहे .भय सस्पेन्स आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली ही कथा प्रेक्षकांना एका भयंकर खेळाच्या जाळ्यात ओढून नेते .
6/12

मानवी स्वभावाचा काळा चेहरा आणि जीवघेण्या परिस्थितीत जगण्यासाठी चाललेला संघर्ष यातून उलगडत जातो .अत्याधुनिक विज्युअल आणि प्रेक्षकांना झपाटून टाकणारी पटकथा या चित्रपटाला पारंपारिक थ्रिलर्स पेक्षा वेगळं बनवते .
7/12

'साहसम ' ही मल्याळमसह तमिळमध्ये उपलब्ध असलेली फिल्म आता Sun NXT वर प्रदर्शित झाली आहे . या सिनेमात असामान्य संकटांचा सामना करताना माणूस कसा टिकून याचा थरारक प्रवास दाखवला आहे .
8/12

साउथची लेडी सुपरस्टार अनुष्का शेट्टी हिचा बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर 'घाटी' 5 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता . मिक्स रिव्ह्यू मिळूनही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे . 26 सप्टेंबर पासून ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट स्ट्रीमिंग साठी उपलब्ध झाला आहे .
9/12

हृदयपूर्वम ' हा साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांचा बहुप्रतिक्षित आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर धडक मारली आहे . 26 सप्टेंबर पासून हा सिनेमा जिओ हॉटस्टार वर प्रेक्षकांना पाहायला उपलब्ध झालाय .
10/12

सत्यम अंठी काढ दिग्दर्शित हा हृदयस्पर्शी कौटुंबिक ड्रामा थिएटरमध्ये प्रदर्शित होताच प्रचंड गाजला होता .आता या सिनेमाचा आस्वाद ओटीटीवरही घेता येणार आहे .विशेष म्हणजे हा चित्रपट तमिळ हिंदी तेलुगू आणि कन्नड ऑडिओमध्येही उपलब्ध आहे .
11/12

मल्याळम चित्र सुपर सृष्टीत गाजलेला 'ओडूम कुतिरा चाडूम कुतिरा ' हा थरारक चित्रपट आता ओटीटीवर .26 सप्टेंबर पासून हा सिनेमा नेटफ्लिक्स वर स्ट्रीम होत असून सस्पेन्स ड्रामा आणि प्रभावी अभिनयाने थिएटरमध्ये ही गाजला होता .तमिळ ऑडिओ सह तेलगू कन्नड आणि हिंदी अशा विविध भाषांमध्ये या सिनेमाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे .
12/12

क्राईम ड्रामा चाहत्यांसाठी जिओ हॉटस्टार वर स्ट्रीम झालेली 'पोलीस पोलीस ' हा तमिळ वेब सिरीज परफेक्ट बिंज वॉच ठरणार आहे . या सिरीज मध्ये पोलिसांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संघर्षावर प्रकाश टाकण्यात आला आहे .गुन्ह्यांची चौकशी अनपेक्षित उलगडे न्याय आणि भ्रष्टाचारातील खेळ यामुळे ही वेब सिरीज अधिकच रंजक ठरते .
Published at : 02 Oct 2025 11:50 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
विश्व
व्यापार-उद्योग























