Housefull 5 Box Office Collection Day 4: चौथ्याच दिवशी 'हाऊसफुल्ल 5' 100 कोटी पार; 'जाट', 'केसरी 2'वरही मात, आता पुढचं टार्गेट भाईजान?
Housefull 5 Box Office Collection Day 4: 'हाऊसफुल्ल 5' बॉक्स ऑफिसवर धमाल करतेय. या फिल्मनं रिलीजच्या चारच दिवसांत 100 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Housefull 5 Box Office Collection Day 4: अक्षय कुमार (Akshay Kumar), रितेश देशमुख (Riteish Deshmukh), नाना पाटेकर (Nana Patekar) स्टारर 'हाऊसफुल्ल 5' (Housefull 5) बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतेय. फिल्मला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसं पाहायला गेलं तर या मल्टि स्टारर कॉमोडी थ्रिलरची ओपनिंग शानदार झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, 'हाऊसफुल्ल 5'नं ओपनिंग विकेंडला धम्माल केलीय. अशातच 'हाऊसफुल्ल 5'नं रिलीज झाल्यापासून पहिल्या मंडेपर्यंत किती कोटींची कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'हाऊसफुल्ल 5'नं चौथ्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला? (Housefull 5 Total Box Office Collection)
ड्यूअल क्लायमॅक्स असलेली दोन वर्जनमध्ये रिलीज झालेली 'हाऊसफुल्ल 5' बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतेय. यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर गंटागळ्या खाणाऱ्या अक्षय कुमारला यामुळे थोडासा का होईना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तसं पाहायला गेलं तर, फिल्मबाबत फारच हाईफ क्रिएट करण्यात आली होती, ज्यामुळे थिएटर्समध्ये रिलीज होताच सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उड्याल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच अक्षय कुमारच्या मल्टी स्टारर फिल्मनं बॉक्स ऑफिसवर 24 कोटींचं कलेक्शन करत शानदार सुरुवात केलेली. अशातच शनिवारी फिल्मनं 31 कोटी आणि त्यानंतर रविवारी 32 कोटींची कमाई केली. यासोबतच तीन दिवसांत 87.5 कोटी रुपयांचं कलेक्शन केलेलं. अशातच फिल्म मंडे टेस्टमध्ये कमाल करत असल्याचं पाहायला मिळालं.
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'हाऊसफुल्ल 5'नं रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच, पहिल्या सोमवारी 13.50 कोटींची कमाई केली. यासोबतच 'हाऊसफुल्ल 5'च्या चार दिवसांची एकूण कमाई आतापर्यंत 101.00 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
View this post on Instagram
'हाऊसफुल्ल 5'नं चौथ्या दिवशी जाट-केसरी 2 वरही केली मात
'हाऊसफुल्ल 5'नं रिलीजच्या चौथ्या दिवशीही कमाल केलीय. या फिल्मनं केवळ चारच दिवसांत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. तर, 'जाट' (90.34 कोटी) आणि 'केसरी 2' (94.37 कोटी)नं लाईफ टाईम कलेक्शनलाही मात दिली आहे. यासोबतच फिल्म वर्षातली पाचवी सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली आहे. आता फिल्मचं पुढचं टार्गेट 'सिकंदर' (129.95) कोटी आहे. अशातच आता अपेक्षा आहे की, 'हाऊसफुल्ल 5' बुधवारपर्यंत भाईजानच्या 'सिकंदर'लाही मात देईल.
'हाऊसफुल्ल 5'चं बजेट आणि स्टार कास्ट
'हाऊसफुल 5' हा चित्रपट 225 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटानं चार दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जर ही कमाई अशीच सुरू राहिली तर दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट 150 कोटींचा टप्पा ओलांडू शकतो. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर, तरुण मनसुखानी दिग्दर्शित 'हाऊसफुल 5' मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी आणि सोनम बाजवा यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























