House Arrest Contestant Gehana Vasisth On Controversy: प्रियांका चोप्रा, राधिका आपटे कपडे काढून सिनेमात दिसतात ते कसं चालतं ? 'हाऊस अरेस्ट' मधील अभिनेत्रीचे खडे सवाल
House Arrest Contestant Gehana Vasisth On Controversy: प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये जाऊन कपडे काढते तेव्हा अश्लीलता पसरत नाही का? असा सवाल तिनं विचारला आहे. गहनाच्या प्रतिक्रियेनंतर इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

House Arrest Contestant Gehana Vasisth On Controversy: 'हाऊस अरेस्ट'चा (House Arrest) आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर एजाज खानचा (Ajaz Khan) शो उल्लू अॅपवरून (Ullu App) काढून टाकण्यात आला आहे. आता या प्रकरणी एजाज खानवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अशातच आता 'हाऊस अरेस्ट'ची (House Arrest Show) स्पर्धक गहना वशिष्ठनं यावर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, 'हाऊस अरेस्ट'बाबत सकारात्मक प्रतिक्रिया देत, तिनं प्रियांका चोप्राला (Priyanka Chopra) यामध्ये ओढलं आहे. प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये (Hollywood) जाऊन कपडे काढते तेव्हा अश्लीलता पसरत नाही का? असा सवाल तिनं विचारला आहे. गहनाच्या प्रतिक्रियेनंतर इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.
'हाऊस अरेस्ट'ची स्पर्धक गहना वशिष्ठ म्हणाली की, "प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये जाऊन कपडे काढते तेव्हा अश्लीलता पसरत नाही का?"
अलीकडेच उल्लू अॅपच्या 'हाऊस अरेस्ट' या रिअॅलिटी शोची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि खळबळ माजली. यामध्ये, शोचा होस्ट एजाज खान स्पर्धकांना कामसूत्रातील पोझिशन्स करायला लावताना दिसला आणि त्यांना हे पोझिशन्स सर्वांना शिकवायलाही सांगितलं. स्पर्धक गहना वशिष्ठही या एपिसोडमध्ये होती. गहानानं को-कंटेस्टेंटसोबत कामसूत्र पोझिशन्स देखील करुन दाखवल्या होत्या.
NCW कडून एजाज खान, उल्लू ॲपच्या CEO ना समन्स
'हाऊस अरेस्ट'चा आक्षेपार्ह व्हिडीओ पाहून लोक खूप संतापले आणि त्यांनी शोवर बंदी घालण्याची मागणी केली. राष्ट्रीय महिला आयोगानं उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि एजाज खान यांनाही समन्स पाठवलं आणि त्यांना 9 मे रोजी हजर राहण्यास सांगितलं. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही या शोवर टीका केली आणि त्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. या सगळ्यात आता गेहना वशिष्ठच्या खळबळ उडाली आहे.
ये हैं gehna Vashisht जो एजाज खान को बचाने आई हैं।#ajaj_Khan #gehnavashisht #housearrest #Bollywood #boycott pic.twitter.com/tIalBySWgL
— 𝐒𝗮𝗻𝗷𝗮𝘆 Mishra (@AskSanjayM) May 2, 2025
गहना वशिष्ठकडून एजाज खानचं समर्थन
ट्विटरवर गहना वशिष्ठचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती म्हणत आहे की, "सध्याचा करंट टॉपिक ट्विटरवर ट्रेंड करत आहे... आणि मला खूप लोकांचे फोन येत आहेत आणि ते म्हणतायत की 'हाऊस अरेस्ट' अश्लीलता पसरवतंय. 'हाऊस अरेस्ट'वर बंदी घातली पाहिजे. मला एक गोष्ट सांगा... इतक्या अडल्ट वेबसाईट्स आहेत... तुम्ही लोक रात्रंदिवस अडल्ट गोष्टी पाहता, मग त्या अश्लीलता पसरवत नाहीत का? त्याच्यावर कारवाई का केली जात नाही?
'जेव्हा प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये जाऊन तिचे कपडे काढते...'
गहना पुढे म्हणाली की, "जेव्हा प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये जाऊन तिचे कपडे काढते किंवा राधिका आपटे 'सेक्रेड गेम्स'मध्ये टॉपलेस सीन देते... जेव्हा मंदाकिनीजींनी अनेक वर्षांपूर्वी असे सीन केले होते, तेव्हा तुम्हाला वाटत नाही का की, समाजात अश्लीलता पसरवली जात आहे?" जर नेटफ्लिक्स ते दाखवत असेल तर ते बरोबर आहे. जर हॉलिवूड आपल्या भारतीय मुलींची नग्न दृश्ये दाखवत असेल, तर ते बरोबर आहे. पण जर आपण लहान शहरांमधून येऊन स्वतःहून प्रयत्न केला, तर आपण अश्लीलता पसरवत आहोत. व्वा, काय ढोंगीपणा आहे."
"प्रत्येकजण स्वतःच्या मर्जीनं शो करतंय..."
गहाना वशिष्ठनं असंही म्हटलंय की, "हाऊस अरेस्ट'मध्ये सहभागी होण्यासाठी आणि कपडे काढण्यासाठी तिच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणला गेला नाही. ती स्वतःच्या इच्छेनं या शोचा भाग बनली आणि ती पूर्णपणे कंफर्टेबल आहे. ती म्हणाली, "जर मी कंफर्टेबल असेल, सर्व स्पर्धक कंफर्टेबल आहेत. प्रत्येकाचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि प्रत्येकजण स्वतःच्या मर्जीनं शो करत आहे, मग यात एजाज खान आणि उल्लू अॅप कुठून आलं? त्यांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला आहे, आम्ही शोमधील साऱ्या अॅक्टिव्हिटी करत आहोत. आम्हाला कोणीही जबरदस्ती करत नाहीये."
"आम्ही योगासनं दाखवत होतो..."
गहानानं पुढे बोलताना असं म्हटलंय की, "ते इंटिमेट योगा पोझिशन्स करत आहेत आणि लोकांनी तो फक्त एक रिअॅलिटी शो म्हणून पाहावा. ती म्हणाली, "आम्ही योगासन करत आहोत." तुम्ही खजुराहो आणि इतर अनेक ठिकाणी जाता... जिथे विचित्र योगासनं आहेत. तो फक्त एक शो आहे, एक रिअॅलिटी शो आहे. एखाद्या रिअॅलिटी शोसारखे घ्या ना? तुम्ही याला इन्फॉर्मेशन चॅनेलसारखं का समजण्याचा प्रयत्न का करत आहात?"
महत्त्वाच्या इतर बातम्या :























