अंतराळात पहिल्यांदाच चित्रपटाचं शूटिंग, मुख्य भूमिकेत टॉम क्रूज; नासाची घोषणा
पहिल्यांदाच अंतराळात चित्रपटाचं शुटिंग करण्यात येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज दिसून येणार आहे. यामुळे टॉम क्रूज अंतराळात जाणारा पहिला अभिनेता ठरणार आहे.
मुंबई : हॉलिवूड स्टार टॉम क्रूज लवकरच अंतराळात शुटींग करताना दिसून येणार आहे. आता तुम्ही म्हणाल काही काय सांगता? या वृत्ताला नासानेही दुजोरा दिला आहे. टॉम क्रूज आणि एलॉन मस्क्स स्पेस एक्स नासासोबत एकत्र येऊन एका चित्रपटासाठी काम करणार आहेत. ज्याची शुटींग अंतराळात करण्यात येणार आहे. नासाचे अॅडिमिनिस्टेटर जिम यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
जिम ट्वीटमध्ये म्हणाले की, 'नासा टॉम क्रूजसोबत त्यांच्या पुढिल चित्रपटाचं शुटींग स्पेस स्टेशनमध्ये करण्यासाठी उत्सुक आहेत.' यापुढे ते ट्वीटमध्ये म्हणाले की, नासाचं हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी यावेळी नवीन जनरेशनमधील लोक, इंजिनिअर आणि सायन्टिस्ट मदत करणार आहेत.
दरम्यान, टॉम क्रूज पहिला अभिनेता असणार आहे, जो अंतराळात जाऊन शुटिंग करणार आहे. तसेच अंतराळात चित्रित करण्यात आलेला हा पहिला चित्रपट ठणार आहे. अद्याप या चित्रपटाबाबत जास्त काही माहिती मिळालेली नाही. परंतु, असं सांगण्यात येत आहे की, हा एक मोठा आणि महत्त्वकांशी प्रोजेक्ट असणार आहे. दावा करण्यात येत आहे की, या चित्रपटासोबत एलॉन मस्कही जोडले गेले आहेत. एलॉन मस्क यांनी स्वतः नासाच्या वतीने करण्यात आलेल्या ट्वीटला उत्तर दिलं असून त्यामध्ये 'खूप मजा येणार आहे.' असं लिहिलं आहे.
दरम्यान, सध्या असा दावा करण्यात येत आहे की, या चित्रपटाच्या शुटिंगबाबत आता नासा आणि स्पेस एक्सने जास्त माहिती दिली आहे. परंतु, आतापर्यंत हे सांगण्यात आलं नाही की, या चित्रपटाची शुटिंग कधीपासून सुरु होणार आणि केव्हा रिलीज करण्यात येणार.
संबंधित बातम्या :
लॉकडाऊन काळात येणार नवी मालिका; टीव्हीसृष्टीमध्ये ऐतिहासिक पाऊल!
... तो मी नव्हेच; पिठाच्या पिशवीतून पैसे वाटल्याच्या अफवांबाबत आमिर खानचं स्पष्टीकरण
'I For India' वर्च्युअल कॉन्सर्टमधून बॉलिवूडकरांचं मदतीचं आवाहन; शाहरूख, आमिरसह शाहरूख, आमिरसह अनेकांचा सहभागबाबा एकदम ठीक, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीच्या अफवांबाबत मुलाचं ट्वीट
coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज