Hemangi Kavi : हेमांगी कवीची खास पोस्ट; म्हणाली, 'आयुष्यात एकदा तरी...'
हेमांगी कवीनं (Hemangi Kavi) पोस्ट शेअर करून छाया कदम यांचे कौतुक केलं.
![Hemangi Kavi : हेमांगी कवीची खास पोस्ट; म्हणाली, 'आयुष्यात एकदा तरी...' hemangi kavi wish to act with amitab bacchan Appreciate actress Chhaya Kadam in social media post Hemangi Kavi : हेमांगी कवीची खास पोस्ट; म्हणाली, 'आयुष्यात एकदा तरी...'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/9b745e3f640e91567985abd4ee0a37ad_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रफटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. तिनं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं छाया कदम (Chhaya Kadam) या अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.
'छुंड' या चित्रपटामध्ये अभिनेत्री छाया कदमनं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम केलं आहे. 'आयुष्यात एकदा तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा कधीतरी पूर्ण होऊ देत यासाठी आपण प्रार्थना करत असतो. झुंडच्या निमित्तानं छाया तू हे स्वप्न खरं करून दाखवलं', असं म्हणतं हेमांगीनं छाया आणि अमिताभ बच्चन यांचा झुंड चित्रपटामधील फोटो शेअर केला आहे.
पाहा हेमांगीची पोस्ट-
View this post on Instagram
झुंड चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि छाया कदम यांच्यासोबतच आकाश ठोसर, रिंकू राजगु आणि सायली पाटील या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. झुंड चित्रपटाचे कथानक हे स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Salman Khan : सलमान खानला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)