नताशाने दिशा पटानीला सुद्धा मागे टाकलं; जीन्सची चेन खोलून दिलेल्या पोजमधील फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप
Natasa Stankovic Photoshoot : नताशाने तिच्या जीन्सची चैन उघडून पोझ दिली आहे. नेटिझन्सना तिचा लूक आवडला नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.

Natasa Stankovic Photoshoot : क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची घटस्फोटीत पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक तिच्या स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. अलीकडेच नताशाने तिच्या नवीन फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोशूट दरम्यान, नताशा स्टॅनकोविकने काळ्या रंगाचा स्पोर्ट्स ब्रा आणि निळ्या रंगाची डेनिम जीन्स परिधान केली आहे. मिनिमल मेकअप आणि खुले केस अशा लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे तिने जीन्सची चैन उघडून दिलेली पोझ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. या लूकमुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

जीन्सची चैन उघडून दिली पोझ; ट्रोलिंग सुरू
नताशाच्या या फोटोंवर काही चाहते तिच्या नव्या लूकचं कौतुक करत आहेत, तर काहींनी तिच्या अशा पोझवर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिलं, "दाखवायलाही येत नाही आणि लपवायलाही येत नाही." दुसऱ्याने लिहिलं, "ही कोणतं पोझ आहे भाऊ?" तर आणखी एका युजरने विचारलं, "चड्डी दाखवण्याचा नवा ट्रेंड सुरु केलाय का?" एका व्यक्तीने तर थेट म्हटलं, "थोडी तरी लाज बाळग."
View this post on Instagram
हार्दिक आणि नताशाची प्रेमकहाणी आणि घटस्फोट
नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याची ओळख 2018 मध्ये मुंबईतील एका नाईट क्लबमध्ये झाली होती. 2019 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि 2020 मध्ये कोविड लॉकडाऊनच्या काळात लग्न केलं. जुलै 2020 मध्ये त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी अगस्त्य ठेवलं. 2023 मध्ये त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा एकदा विवाह केला. मात्र, 2024 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एका संयुक्त निवेदनाद्वारे त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली आणि सांगितलं की दोघंही मिळून आपल्या मुलाची जबाबदारी उचलतील.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या






















