Happy Birthday Abhishek Bachchan : मुलाच्या वाढदिवशी बिग बी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाले...
Happy Birthday Abhishek Bachchan : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने बिग बी यांनी एक भावूक पोस्ट शेअर करत लाडक्या लेकाला शुभेच्छा दिल्या आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज वाढदिवस आहे. अभिषेकचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 साली झाला होता. अभिषेक त्याचा 45 वा वाढदिवस साजका करत आहे. अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त बिग बी अमिताभ बच्चन यांनी लाडक्या लेकाला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी अभिषेकचा हात पकडून फिरायला घेऊन जात आहे, हा लहानपणीचा फोटो आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिषेक मोठा झाल्यानंतर बिग बी ला हात पकडून घेऊन जात आहे. हा फोटो शेअर करताना बीग बी भावूक झाले आहेत. त्यांनी लिहिले की, "कधी मी याला हात पकडून चालायला शिकवले होते, आज हा माझा हात पकडून फिरायला घेऊन जातो".
View this post on Instagram
वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी ही पोस्ट अत्यंत वेगाने व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अभिषेक बच्चनने प्रतिक्रिया दिली असून "लव्ह यू पा.." असे म्हटले आहे.
या शिवाय अभिषेक बच्चनला त्याची भाची नव्याने देखील शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये अभिषेक तिचा कुटुंबातील सर्वात आवडती व्यक्ती असल्याचे म्हटले आहे.
View this post on Instagram
अभिषेक बच्चनला अजय देवगण सुनावतो तेव्हा..
अभिषेक बच्चन 2000 साली जेपी दत्ता यांच्या रिफ्यूजी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2004 साली ब्लॉकबस्टर धूममध्ये दिसला. बंटी और बबली, सरकार, दस, द्रोणा, दोस्ताना, पा, प्लेयर्स अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. 2007 साली अभिषेकने ऐश्वर्या बच्चनसोबत लग्न केले.