एक्स्प्लोर

Marathi Movie Gondhal: 'आमचा ट्रेलर बघू नका...!'; आगामी मराठी सिनेमाच्या दिग्दर्शकाचं प्रेक्षकांना विचित्र आवाहन, घडलंय काय?

Marathi Movie Gondhal: सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरसोबतच महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला सन्मान देणारे चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अशाच परंपरेचा गाभा उलगडणारा बहुचर्चित 'गोंधळ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Marathi Movie Gondhal: एखादा सिनेमा येणार असेल, तर त्याचं दणक्यात प्रमोशन केलं जातं. त्या सिनेमातली स्टार कास्ट (Marathi Pramotion) वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सिनेमा पाहण्याचं आवाहन करते. अनेक मुलाखतींमध्ये जाऊन सिनेमाबाबत, त्यातल्या सीन्सबाबत गप्पागोष्टी केल्या जातात. सिनेमा रिलीज होईपर्यंत आणि रिलीज झाल्यानंतरही अनेका दिग्दर्शक, स्टार्स सिनेमा पाहण्याचं सातत्यानं आवाहन करत असतात. पण, जर एखादा सिनेमा रिलीज होत असेल आणि जर त्या सिनेमाच्या दिग्दर्शकानं सांगितलं की, 'आमचा ट्रेलर बघू नका!', तर... आश्चर्य वाटेलच ना.... असंच काहीसं झालंय आगामी मराठी सिनेमाबाबत. गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शक आवाहन करतोय की, 'आमचा ट्रेलर बघू नका!'...

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ग्लॅमरसोबतच महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला सन्मान देणारे चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अशाच परंपरेचा गाभा उलगडणारा बहुचर्चित 'गोंधळ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता पसरली आहे. आता या उत्सुकतेत भर घालत दिग्दर्शक संतोष डावखर (Director Santosh Davkhar) यांनी एक अनोखं आवाहन केलंय, "आमचा ट्रेलर बघू नका!" 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Santosh Davakhar (@santosh_davakhar)

दिग्दर्शक असं आवाहन का करतायत? 

आजकाल जिथे चित्रपटांच्या ट्रेलरचं जोरदार प्रमोशन केलं जातं, तिथे 'गोंधळ' टीमनं उलटा प्रयोग केला आहे. दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात की, त्यांनी प्रेक्षकांना ट्रेलर न पाहाण्याचं आवाहन करून चित्रपटाबद्दलची कुतूहल वाढवण्याचा मानस ठेवला आहे. सोशल मीडियावर ही प्रमोशन स्ट्रॅटेजी सध्या जोरदार चर्चेचा विषय बनली आहे आणि प्रेक्षक या निर्णयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, "गोंधळ'ची कथा, पात्र आणि कलाकार अतिशय रंजक आहेत; त्यामुळे प्रेक्षकांनी ट्रेलरपेक्षा संपूर्ण चित्रपट थेट सिनेमागृहात बसून पाहावा. प्रत्येक पात्र हळूहळू गूढ उलगडत जातं. नाहीतर चित्रपटातील थ्रिल थोडा 2-3 टक्के कमी होऊ शकतो. चित्रपट पाहिल्यानंतरच या कथेचा गाभा, भावना आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा खरा रंग प्रेक्षकांना जाणवेल. ज्यांना चित्रपटाबद्दल काही शंका असतील, त्यांनीच ट्रेलर पाहावा. काही गोष्टी या चित्रपटात अशा आहेत, ज्या 70 एमएम पटलावर प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये प्रथमच दिसतील..."

डावखर फिल्म्स प्रस्तुत 'गोंधळ'ची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके यांसह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

दरम्यान, 'गोंधळ' चित्रपटाचं मेकिंग युट्यूबवर प्रदर्शित झालं असून चित्रपटात दमदार टीम असल्याचं दिसतंय. दरम्यान, ट्रेलर न पाहाण्याचं हे आवाहन प्रेक्षकांच्या उत्सुकतेत वाढ करेल की, कमी, याचा परिणाम लवकरच स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sooraj Pancholi Quits Bollywood: भाईजाननं लॉन्च केलेल्या हँडसम हंकचा बॉलिवूडला कायमचा अलविदा; सुपरस्टार वडिलांचा नाव न घेता कपूर कुटुंबीयांवर गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
OTT Release This Week: या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget