RJ सिमरनचा आत्महत्येचं नेमकं कारण काय? मोठी अपडेट आली समोर, खुद्द कुटुंबीयांनीच सांगितलं की....
लाखोंनी फॉलोअर्स असलेल्या फ्रिलान्स आरजेने टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने केलेल्या कृत्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध असलेल्या अवघ्या 26 वर्षीय आरजे अर्थात रेडिओ जॉकी सिमरन सिंगने (RJ Simran Singh) धक्कादायक पाऊल उचललं आहे. तिने आपल्या भाड्याच्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली आहे. ती एक फ्रिलान्स आरजे होती. जम्मू काश्मीरमध्ये तिचे लाखोंनी चाहते आहेत.इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास साडेसात लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या आत्महत्येनंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच तिने आत्महत्या नेमकी का केली होती? त्यामागचं कारण काय? असा सावलही केला जातोय. यावरच आता तिच्या कुटुंबीयांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर सात लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स
मिळालेल्या माहितीनुसार आरजे सिमरन सिंह ही एक सोशल मिडिया एन्फ्लुएन्सर आहे. तिचे इन्स्टाग्रावर सादा 7 लाख 12 हजार फॉलोअर्स आहेत. तिने 13 डिसेंबर रोजी इन्स्टाग्रावर शेवटची पोस्ट केली होती. सोशल मीडियावर 'जम्मू की धडकन' म्हणून प्रसिद्ध आहे. ती तिच्या भाड्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.
घरच्यांचे मत काय?
दरम्यान, तिच्या जाण्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. त्यामुळेच तिने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असेल, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत कोणाविरोधात तक्रारही केलेली नाही. तसेच त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.
View this post on Instagram
आत्महत्या केल्याचं कसं समजलं?
बुधवारी रात्री उशिरा तिच्या मित्रांना तिने आत्महत्या केल्याचे समजले. त्यानंतर तिच्या मित्रांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. त्यानंतर तिचा मृतदेह लटकलेल्या आवस्थेत आढळला. तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी सिमरनने कोणतीही सुसाईट नोट लिहिलेली नाही.
पोलीस आत्महत्येचा तपास करणार, प्रकरणाच्या खोलात जाणार
दरम्यान, पोलीस सिमरनचे कुटुंबीय तसेच तिच्या मित्रांची चौकशी करणार आहे. तिच्या मोबाईलीचही तपासणी होणार आहे. यातून तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल, अशी पोलिसांना आशा आहे. मात्र सिमरनने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे तिचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
सलमान खानचं फार्महाऊस म्हणजे अय्याशीचा अड्डा? भाईजानने थेट सांगून टाकलं, म्हणाला...
Sikandar Teaser : सलमान खानच्या 'सिकंदर'चे टिझर रिलीज लांबणीवर, आता नेमकं कधी प्रदर्शित होणार?
बापरे बाप! अनन्या पांडेच्या आलिशान महलाचं गौरी खानशी खास नातं, घराचे फोटो पाहून व्हाल थक्क!