एक्स्प्लोर

Gujarat Cabinet: गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार

Gujarat cabinet reshuffle 2025: सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 17 मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत आणि तेवढेच राज्यमंत्री (एमओएस) आहेत.

Gujarat Cabinet: दिवाळीच्या अगदी तोंडावर गुजरात मंत्रिमंडळात (Gujarat cabinet reshuffle 2025) फेरबदल होणार आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. सर्व मंत्र्यांनी मुख्यंत्र्यांकडे राजीनामे सोपवले आहेत. भूपेंद्र पटेलांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे सोपवले. राजीनाम्यापूर्वी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर राजीनामे स्वीकारले गेले. दरम्यान, आता सर्व राजीनामे राज्यपालांकडे सोपवले जातील. महत्त्वाचं म्हणजे सर्व मंत्र्यांचे राजीनामे खिशात होते, या राजीनामापत्रांवर सह्याही होत्या. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर सर्व मंत्र्‍यांनी खिशातून राजीनामे बाहेर काढले. नवीन मंत्र्यांचा शपथविधी उद्याच 17 ऑक्टोबर रोजी अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत होईल. सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 17 मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत आणि तेवढेच राज्यमंत्री (एमओएस) आहेत. भाजपच्या सर्व आमदारांना दोन दिवस गांधीनगरमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची अपेक्षा असलेल्या आमदारांना फोनवरून माहिती देण्यात आली आहे.

अमित शाह आज रात्री गुजरातला रवाना होतील (Amit Shah Gujarat) 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्रीच 9 वाजता गुजरातमध्ये पोहोचतील. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा शुक्रवारी सकाळी गुजरातमध्ये पोहोचत आहेत. राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सलही आज गुजरातला भेट देणार आहेत. मंत्र्यांचे राजीनामे राज्यपाल देवव्रत आचार्य यांना सादर केले जातील. राजीनाम्यांसोबतच नवीन मंत्र्यांची यादी राज्यपालांना सादर केली जाईल. नवीन चेहऱ्यांमध्ये, काँग्रेसमधून सामील झालेले अर्जुन मोढवाडिया, अल्पेश ठाकोर, सीजे चावडा आणि हार्दिक पटेल यांना संधी मिळू शकते. सौराष्ट्रातील जयेश राडाडिया आणि जितू वाघानी यांना मंत्रिपद मिळणे निश्चित आहे. उत्तर गुजरातमधील पाटीदार आणि ठाकोर समुदायांवर विशेष लक्ष दिले जाईल.  

तीन वर्षात कोणतेही बदल नाहीत (BJP cabinet changes) 

भूपेंद्र पटेल यांची 2022 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून, तीन वर्षांसाठी कोणतेही मंत्रिमंडळ बदल झाले नाहीत. 2027 मध्ये निवडणुका होणार आहेत. याला निवडणुकीची तयारी म्हणून पाहिले जात आहे. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सध्याच्या सरकारमधील बहुतेक मंत्री भाजप हायकमांडच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. शिवाय, अलिकडेच झालेल्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि बहुतेक इतर नेते आपच्या गोपाल इटालिया यांना पराभूत करण्यासाठी विसावदरला गेले होते. तरीही, विसावदरची जागा जिंकली गेली नाही. हे मंत्रिमंडळ विस्तारातही दिसून येईल.

जुन्या दिग्गजांना परत आणण्याची तयारी (Gujarat assembly 2027)

2027च्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने विसावदरची जागा जिंकून भाजपला चिंताग्रस्त केल्याची राजकीय चर्चा आहे. त्यामुळे भाजप कोणताही धोका पत्करण्यासही तयार नाही. भाजपमधील शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या परंतु अनेक काळापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने बाजूला राहिलेल्या नेत्यांना आता वरिष्ठ पदे आणि नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील. पुढील नुकसान टाळण्यासाठी काही जुन्या दिग्गजांनाही दुसरी संधी दिली जाऊ शकते.

सत्ताविरोधी लाटेचा परिणाम जाणवू लागला (Gujarat politics news) 

नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीपासून गुजरात सरकारमध्ये सतत बदल होत आहेत. आनंदीबेन पटेल आणि विजय रुपाणी सरकारचे अचानक राजीनामे आणि आता विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सरकारमध्ये बदल, हे सर्व गुजरातच्या लोकांना सत्ताविरोधी लाटेचा परिणाम जाणवू लागल्याने झाले आहे. 

गुजरात सरकारमधील मंत्र्यांची यादी

  • कनुभाई देसाई – वित्त, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स (पारधी)
  • बलवंतसिंह राजपूत – उद्योग, कामगार आणि रोजगार (सिद्धपूर)
  • हृषीकेश पटेल – आरोग्य, कुटुंब कल्याण आणि उच्च शिक्षण (विसनगर)
  • राघवजी पटेल – कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय (जामनगर ग्रामीण)
  • कुंवरजीभाई बावलिया – पाणीपुरवठा आणि नागरी पुरवठा (जसदन)
  • भानुबेन बाबरिया – सामाजिक न्याय आणि महिला व बाल विकास (राजकोट ग्रामीण)
  • मुलुभाई बेरा – पर्यटन, वन आणि पर्यावरण (खंभलिया)
  • कुबेर दिंडोर – शिक्षण आणि आदिवासी विकास (संतरामपूर एसटी)
  • नरेश पटेल – गाणदेवी
  • बच्चूभाई खबर – देवगड बारिया
  • पुरुषोत्तम  सोळंकी – भावनगर ग्रामीण
  • हर्ष संघवी – मजुरा
  • जगदीश विश्वकर्मा - निकोल
  • मुकेशभाई झिनाभाई पटेल – ओलपाड
  • कुणवाजीभाई हलपती – मांडवी (ST)
  • भिकूभाई चतुरसिंग परमार – मोडासा

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget