एक्स्प्लोर
EV Truck Launch : '१०,००० ट्रक बनवणार', CM Devendra Fadnavis यांनी स्वतः चालवून पाहिली देशाची पहिली Electric Truck
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पुण्यातील चाकण (Chakan) येथे Blue Energy Motors च्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इलेक्ट्रिक ट्रकचे (Electric Truck) उद्घाटन झाले. 'अशा १० हजार ट्रक्सची निर्मिती करण्यात येणार आहे,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. हा हेवी-ड्यूटी ई-ट्रक बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानाने (Battery Swapping Technology) सुसज्ज असून, यामुळे प्रदूषण कमी होण्यासोबतच परकीय चलन वाचण्यासही मदत होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्रक चालवून पाहिला. याचबरोबर, देशातील पहिल्या मुंबई-पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरचेही (Mumbai-Pune Electric Corridor) उद्घाटन करण्यात आले. Blue Energy Motors कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत ३,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत ३०,००० ट्रक क्षमतेचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















