एक्स्प्लोर
Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीची कारणं...
Share Market : भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्सनं 83 हजारांचा टप्पा पार केला. तर, निफ्टीमध्येही तेजी दिसून आली.
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड सुरु
1/6

आशियाई बाजारातील तेजीमुळं भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानं आणि ब्रॉडर मार्केटमध्ये खरेदी झाल्यानं निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये 1 टक्के तेजी दिसून आली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्स आज 862.23 अंकांच्या तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्सनं 83 हजारांचा टप्पा पार केला आहे.. सेन्सेक्सनं आज 83615.48 अंकांचा उच्चांक गाठला होता. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 83467.66 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 मध्ये देखील 261.75 अंकांची तेजी पाहायला मिळाली. आज बाजार बंद झाला तेव्हा निफ्टी 50 निर्देशांक 25585.30 अंकांवर बंद झाला.
2/6

सेन्सेक्सवरील 30 कंपन्यांपैकी 27 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. टायटन, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्टस, ट्रेंट, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये 1 ते 3 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
3/6

डॉलरच्या तुलनेत रुपया मजबत झाल्यानं बाजारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. भारतीय रुपया अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत 1 टक्क्यानं मजबूत झाला. यामुळं देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदारांचं मनोबल वाढलं. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून येत्या महिन्यांमध्ये व्याज दरात कपात करण्याच्या आशेनं रुपयात मजबुती आली आहे.
4/6

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत सकारात्मक स्थिती असल्यानं बाजारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार दोन्ही देशांमध्ये सक्रीय चर्चा सुरु आहेत. वाणिज्य सचिव अमेरिकेत होणाऱ्या व्यापारी चर्चेसाठी भारतीय प्रतिनिधिमंडळात सहभागी होणार आहेत.
5/6

जिओजित इन्वेस्टमेंटसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार वी.के. विजयुमार यांनी अमेरिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आलेल्या वक्तव्यामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील वापारातील तणाव कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 16 Oct 2025 06:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























