एक्स्प्लोर

MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले

ST Bus Reservation : आधी एखादा मेमो द्यायचा तर एकच कागद लागत होता, आता नवीन प्रणालीमध्ये तीन प्रिंट काढाव्या लागत असल्याने महामंडळाचा खर्चही वाढला आहे.

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसून येतंय. एसटी आरक्षण प्रणाली (ST Bus Reservation) ठप्प झाल्याने प्रवास कसा करायचा असा प्रश्न आता पडला आहे. आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याचा फटका प्रवाशांसह एसटी महामंडळालाही बसत असल्याचं चित्र आहे. तसेच नवीन प्रणालीमुळे कर्मचारीही वैतागले आहेत.

एसटी आरक्षण प्रणाली सॉफ्टवेअर आणि कंपनीमध्ये दोन वर्षाआधी महामंडळाने बदल केला आहे. त्या माध्यमातून जुन्या आरक्षण प्रणालीच्या जागी नवीन आरक्षण प्रणाली आणली. पण सदर प्रणाली ही सोयीस्कर होण्याऐवजी जास्तच किचकट होत असल्याचं चित्र आहे. ऐन दिवाळीच्या मोक्यावरती आरक्षण प्रणाली पूर्ण बंद पडली असून प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.

ST Bus Reservation : नव्या प्रणालीमुळे खर्चही वाढला

कर्मचाऱ्यांना मेमो देणे, मशीन इश्यु करणे या साठी आधी एका गाडीसाठी आरक्षण मेमो प्रिंट काढतांना एक कागद लागत होता. आता एकाच मेमोची प्रिंट घेण्यासाठी तीन कागद लागतात. त्यामुळे महामंडळाचा खर्चही वाढल्याचं दिसून येतंय.

ST Bus Booking : कर्मचारीही वैतागले

काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती सांगितले की, आधीची आरक्षण प्रणाली ही खूप छान आणि सोयीस्कर होती. पण आता जी आरक्षण प्रणाली आहे ती अतिशय अवघड आणि खूप किचकट करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा या आरक्षण प्रणाली वर काम करताना खूप त्रास होत आहे.

ST Bus News : 12 हजारांची उचल देण्याचा निर्णय

राज्य सरकारकडून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी हात खुला करण्यात आला. राज्य सरकारकडून 48 हफ्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 2200 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आली.

यंदा दिवाळीनिमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस देण्यात येणार आहे. त्याचसोबत 12 हजार रुपयांच्या उचलसंदर्भात देखील घोषणा करण्यात आली.

'आवडेल तिथे प्रवास' पासच्या दरात कपात

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळीच्या आधी 'आवडेल तिथे प्रवास' योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिली आहे. एकूण 20 ते 25 टक्के कपात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

'आवडेल तिथे प्रवास' या योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा मिळते. या योजनेत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कोणत्याही एसटी बसने अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते. एसटीचा चार किंवा सात दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते.

ही बातमी वाचा:

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget