फ्लॅशबॅक! अभिनेत्रीसोबत अश्लील चॅट्स ते राहुल सोलापूरकरचा वाद; मावळत्या 2025 मध्ये सिनेसृष्टीत काय काय घडलं?
Marathi Industry’s Most Talked-About Controversies of 2025: मराठी सिनेसृष्टी अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. कलाकारांचे वक्तव्य अन् त्यावर राजकीय प्रतिक्रिया.

Marathi Industry’s Most Talked-About Controversies of 2025: 2026 या नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करताना फ्लॅशबॅकमधील 2025 च्या मनोरंजक अन् वादग्रस्त घटनांना विसरुन पुढे जाता येणार नाही. सिनेसृष्टीतील याच गोष्टी, किस्से आणि रंजक स्टोऱ्यांची उजळणी आपण या लेखातून करत आहोत. 2025 हे वर्ष काही कलाकार, चित्रपट आणि काही टेलिव्हिजन कलाकारांसाठी वादग्रस्त ठरलं होतं. कथानक, गाणी तसेच सेलिब्रिटींच्या वक्तव्यांमुळे एकंदरीत मराठी इंडस्ट्रीचं काही प्रमाणात टेन्शन वाढलं होतं. 2025 हे वर्ष मराठी इंडस्ट्रीसाठी नेमकं कसं गेलं? हे थोडक्यात जाणून घेऊयात.
राहुल सोलापूरकरांचं वक्तव्य अन् वादाची ठिणगी
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकरांनी वर्षाच्या सुरूवातीलाच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी महापुरूषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे फक्त सिनेसृष्टी नसून, संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. एका मुलाखतीत त्यांनी महापुरूषांबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांसह राजकीय नेत्यांनीही त्यांच्यावर टीकेची तोफ डागली होती.
छावा सिनेमा हिट पण अडकला वादाच्या भोवऱ्यात
छावा हा ऐतिहासिक चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकाच्या भेटीस आला होता. छावा या सिनेमाने अल्पवधीतच बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. या चित्रपटात हिंदी तसेच मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळली होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मुख्य म्हणजे मराठी कलाकार संतोष जुवेकर याने अक्षय खन्नाबाबात वक्तव्य केल्यामुळे तो चांगलंच ट्रोल झाला होता.
'खालिद का शिवाजी' चित्रपटावर आक्षेप
मराठी चित्रपट 'खालिद का शिवाजी' प्रदर्शनापूर्वीच मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याच कारणावरून अनेक हिंदू संघटनांनी या चित्रपटावर आक्षेप नोंदवला.
मनाचे श्लोक
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे हिचा बहुचर्चित 'मनाचे श्लोक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. समर्थ रामदास स्वामी यांच्या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर चित्रपटासाठी केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत या चित्रपटाचा विरोध केला.
प्राची पिसाटचा सुदेश म्हशीलकरांवर आरोप
मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिनं अभिनेते सुदेश म्हशीलकरांवर गंभीर आरोप केले होते. सुदेश म्हशीलकर यांनी प्राचीला 'नको ते मेसेज' पाठवले असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्राचीनं या संबंधित चॅट्सचे स्क्रीनशॉट देखील शेअर केला होता. या स्क्रीनशॉट्समुळे मराठी इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.























