![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Fat to Fit : एकेकाळी वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झालेली Sapna Choudhary; आता फिटनेसमध्ये बड्या अभिनेत्रींना देतेय टक्कर
प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरी बिग बॉस या शोमुळे चर्चेत आली. तिच्या वजनामुळे अनेकांनी तिला ट्रोल केले होते.
![Fat to Fit : एकेकाळी वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झालेली Sapna Choudhary; आता फिटनेसमध्ये बड्या अभिनेत्रींना देतेय टक्कर Fitness Tips Sapna Choudhary Fat to Fit journey fitness weight loss how to lose increased weight Fat to Fit : एकेकाळी वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झालेली Sapna Choudhary; आता फिटनेसमध्ये बड्या अभिनेत्रींना देतेय टक्कर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/11/b7acfe0027588625283a4b5488975c88_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sapna Choudhary Fitness Mantra: प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीने जेव्हा बिग बॉसमध्ये भाग घेतला तेव्हा पासून ती चर्चेत आली. बिग बॉसमुळे तिला नवी ओळख मिळाली. या शोमधून बाहेर आल्यानंतर सपनाच्या स्टाइल आणि लूकला लोकांची पसंती मिळत होती. सपनाचा हटके अंदाज तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधतो. सपना नुकतीच आई झाली आहे. प्रेग्नंसीनंतर तिचे बरेच वजन वाढले होते. पण आता सपना तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सपनाच्या या फिटनेस टिप्स नक्की ट्राय करा.
सपनाचा वर्क आऊट-
बिग बॉस 11 मध्ये सपनाने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. सपनाला तिच्या वजनामुळे अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केले होते. वजन कमी करण्यासाठी तिने फक्त वर्कआऊट केला नाही तर डाएटकडे तिने विशेष लक्ष दिले. सर्वांना माहित आहे की सपना डान्सर आहे. त्यामुळे तिने डान्सनेच तिचे वजन कमी केले. डान्स करणे हा एक उत्तम वर्क आऊट आहे.
सपनाचा डाएट प्लॅन
सपनाने वजन कमी करण्यासाठी तिच्या डाएटकडे विशेष लक्ष दिले. एका रिपोर्टनुसार सपनाने वजन कमी करण्यासाठी थंड पाणी प्यायचे सोडले. अनेक दिवस कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस घालून ते पाणी सपना प्यायची.
नाश्ता- सपना हेवी नाश्ता करते. नाश्तामध्ये ती मल्टीग्रेन ब्रेड, एग व्हाइट आणि स्प्राउट्स हे पदार्थ खाते.
View this post on Instagram
दुपारचे जेवण- दुपारच्या जेवणामध्ये सपना प्रोटिनचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाते तसेच हिरव्या पालेभाज्या, पनीर आणि पोळी सपना दुपारच्या जेवणात खाते.
रात्रीचे जेवण- रात्रीच्या जेवणामध्ये सपना चिकन सूप आणि सॅलेड खाते. ती 7.30 वाजता जेवण करते.
तसेच चहाच्या ऐवजी सपना नारळाचे पाणी पिते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)