Gulabi Sadi song in FilmFare : 'फिल्मफेअर'च्या मंचावर 'गुलाबी साडीची' हवा, मराठी कलाकारांनी धरला ठेका;पाहा व्हिडिओ
Gulabi Sadi song in FilmFare : नुकत्याच पार फिल्मफेअरच्या मंचावर गुलाबी साडी हे गाणं सादर करण्यात आलं, यावर मराठी कलाकारांनी देखील ठेका धरला.
![Gulabi Sadi song in FilmFare : 'फिल्मफेअर'च्या मंचावर 'गुलाबी साडीची' हवा, मराठी कलाकारांनी धरला ठेका;पाहा व्हिडिओ FilmFare Marathi Awards Gulabi Sadi song present on stage Marathi celebrity dance Video Viral on Social Media Entertainment latest update detail marathi news Gulabi Sadi song in FilmFare : 'फिल्मफेअर'च्या मंचावर 'गुलाबी साडीची' हवा, मराठी कलाकारांनी धरला ठेका;पाहा व्हिडिओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/19/007808229efffbb9cca51a390de4941f1713542060632720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi FilmFare Awards : संपूर्ण महाराष्ट्राला सध्या एका गाण्याने पूर्ण वेड लावलंय. त्या गाण्यावर फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडच्या कलाकारांनी देखील रिल केलं आणि जगभरात हे गाणं पोहचलं. सध्या सोशल मीडियावर 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) या गाण्याची चांगलीच हवा आहे. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere), प्रिया बापट-उमेश कामत (Priya Bapat - Umesh Kamat), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) अशा अनेक कलाकारांनी या गाण्यावर रील केलंय. नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर (FilmFare) या पुरस्कार सोहळ्यात हे गाणं वाजवण्यात आलं.
सिनेसृ्ष्टीत मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला कलासृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात गुलाबी गाणी हे गाणं सादर करण्यात आलं. इतकच नव्हे तर मराठी कलाकारांनी या गाण्यावर ठेकाही धरला. आतापर्यंत लाखो लोकांनी या गाण्यावर रील केलं आहे. अगदी सामन्य नागरिकांपासून ते मोठ मोठ्या सेलिब्रेटींनी हे गाणं अक्षरश: डोक्यावर घेतलं. त्यातच आता या गाण्याला थेट फिल्मफेअरचं व्यासपीठ मिळालं आहे.
कलाकारांनी धरला गुलाबी साडीवर ठेका
या मानाच्या सोहळ्याला कलाकार अगदी आवर्जुन उपस्थित राहतात. या सोहळ्याचं सूत्रसंचालन अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांनी केलं. जेव्हा हे गाणं मंचावर सादर करण्यात आलं त्यावेळी रिंकू राजगुरु, सायली संजीव, अभिज्ञा भावे, प्रियदर्शिनी इंदलकर या अभिनेत्रींनी एकत्र ठेका धरला. त्यांच्यासोबत सिद्धार्थही मंचावर नाचत होता. पण त्याचवेळी खाली प्रेक्षकांमध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद हिने ठेका धरला आणि तिला अमेय वाघने साथ दिल्याचं पाहायला मिळालं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात आत्मपॅम्फ्लेट आणि बाईपण भारी देवा या सिनेमांनी बाजी मारली. सध्या या सोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)