
Fast & Furious 9 OTT Release: आता घरबसल्या पाहता येणार ‘फास्ट अँड फ्युरियस 9’, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज!
Fast & Furious 9 OTT Release: ‘फास्ट अँड फ्युरियस 9’ हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. चाहत्यांना घर बसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे. ‘

Fast & Furious 9 OTT Release: हॉलिवूडच्या अॅक्शन फिल्म्सचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. काही हॉलिवूड चित्रपट खास अॅक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध आहेत. ‘फास्ट अँड फ्युरियस’ हे देखील यापैकीच एक नाव आहे. नुकताच ‘फास्ट अँड फ्युरियस 9’ (Fast & Furious 9) प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अनेकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली होती. तर, काही चाहत्यांना आणि प्रेक्षकांना तो अद्याप बघता आला नव्हता. मात्र, आता या चित्रपटाच्या चाहत्यांना घर बसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे. ‘फास्ट अँड फ्युरियस 9’ हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे.
‘फास्ट अँड फ्युरियस 9’ हा चित्रपट 21 जुलैपासून ‘Amazon Prime’वर रिलीज झाला आहे. खुद्द अॅमेझॉनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत याची माहिती देण्यात आली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये बघता येणार आहे.
पाहा पोस्ट :
‘फास्ट अँड फ्युरियस 9’ हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजेच 25 जून, 2021 रोजी भारतात रिलीज झाला होता. कोरोना विषाणूच्या कहरामुळे चित्रपटगृह बंद करण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट फार कला चालाल नव्हता. मात्र, या चित्रपटाने 1.92 कोटींची ओपनिंग आणि 13.61 कोटींचे कलेक्शन केले होते. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
‘फास्ट अँड फ्युरियस 9’ला प्रेक्षकांची पसंती
‘फास्ट अँड फ्युरियस 9’ हा चित्रपट गेल्या वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. जस्टिन लिन दिग्दर्शित या चित्रपटात विन डिझेल, मिशेल रॉड्रिग्ज, टायरेस गिब्सन, जॉन सीना, नॅथली इमॅन्युएल, कर्ट रसेल आणि चार्लीझ थेरॉन या कलाकारांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. आतापर्यंत या चित्रपटाचे 9 भाग रिलीज झाले आहेत. याची सुरुवात 2001 मध्ये ‘द फास्ट अँड द फ्युरियस’ने झाली. कार रेस आणि गुन्हेगारी याभोवती फिरणारे हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. विन डिझेल हा या सगळ्या चित्रपटातील मुख्य अभिनेता होता. बॉलिवूड अभिनेता अली फजलने यानेही या फ्रँचायझीचा सातवा चित्रपट ‘फास्ट अँड फ्युरियस 7’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
