Video: 'आमच्या बेबी सिंबाचं चित्रपटात पदार्पण', 'सिंघम अगेन'च्या ट्रेलर लॉन्चला रणवीर सिंह लेकीबद्दल भरभरून बोलला..
सोमवारी मुंबईत सिंघम अगेन च्या ट्रेलर लॉन्च चा सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी मुलगी झाली रे असं म्हणत रणवीरनं बाळ झाल्याचा आनंद व्यक्त केला व म्हणाला...
Ranveer singh: बॉलीवूडचे हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना सप्टेंबर महिन्यात कन्यारत्न झाले. त्यांची मुलगी आता एक महिन्यांची झाली आहे. सध्या सिंघम अगेन च्या रिलीज ची तयारी सुरू असून रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला नुकताच मुंबईत कार्यक्रम पार पडला. यावेळी बाळाची काळजी घेण्यात दीपिका बिझी असल्याने मी आलोय असं सांगत रणवीर सिंग आपल्या मुलीविषयी भरभरून बोलला. सिंघम अगेन हा त्याचा मुलीचा डेब्यू चित्रपट आहे असं रणवीर म्हणाला.
मुलगी झाली रे... म्हणाला दीपिका बाळाला सांभाळण्यात बिझी
सोमवारी मुंबईत सिंघम अगेन च्या ट्रेलर लॉन्च चा सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी मुलगी झाली रे असं म्हणत रणवीरनं बाळ झाल्याचा आनंद व्यक्त केला व म्हणाला, दीपिका बाळाला सांभाळण्यात बिझी असल्याने मी आलो आहे. बाळाला सांभाळण्याची माझी ड्युटी रात्री असते त्यामुळे आत्ता मी येऊ शकलो.
Mulgi Zali Re 😂🔥 Ranveer-Deepika's Baby to debut in Singham Again 😍🔥 Here's Video #RanveerSingh #DeepikaPadukone #SinghamAgain pic.twitter.com/R6UbjbvMDU
— $@M (@SAMTHEBESTEST_) October 7, 2024
सिंघम अगेन माझ्या मुलीचा डेब्यू सिनेमा
दीपिका बाळाला सांभाळत असल्याने ती कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे मी आलोय. चित्रपटात अनेक स्टार्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की हे माझ्या मुलीचा डेब्यू सिनेमा आहे. कारण या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी दीपिका गरोदर होती हे सगळ्यांना माहित आहे. संपूर्ण परिवारासोबत दिवाळी साजरी करा असे म्हणत रणवीर न उपस्थितितांना शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, 'लेडी सिंघम आणि बाळ सिंबाच्या वतीने तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कृपया यंदाची दिवाळी आपल्या कुटुंबासोबत चित्रपटगृहात हा चित्रपट पाहून साजरी करा.'
अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, दीपिकासह मोठी स्टारकास्ट
सिंघम अगेन या रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमाचा ट्रेलर सोमवारी मुंबईत लॉन्च करण्यात आला. या सिनेमात अक्षय कुमार जॅकी श्रॉफ आणि सीआयडी फिल्म दयानंद शेट्टी दिसत आहेत. यात लेडीज सिंघम म्हणून दीपिकांनी भूमिका केली आहे. हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजन करणारा ठरणार असल्याचे सांगितलं जातंय. सिंघम अगेनमध्ये ही अजय देवगन पुन्हा एकदा डीसीपी बाजीराव सिंघम च्या भूमिकेत दिसणार आहे तर करीना कपूर नाही यात पुनरागमन केलं आहे.
हेही वाचा: