Project K : 'प्रोजेक्ट के'चं नवं पोस्टर आऊट! चाहते म्हणाले,'प्रभास इतिहास रचणार'

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 15 Jul 2023 05:06 PM
Baby Box Office Collection: 14 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा साऊथ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
बेबी (Baby) नावाचा एक साऊथ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. Read More
Project K : 'प्रोजेक्ट के'चं नवं पोस्टर आऊट! चाहते म्हणाले,"प्रभास इतिहास रचणार"
Prabhas : प्रभासचा 'प्रोजेक्ट के' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Simrat Kaur Intimate Pics: 'गदर 2' फेम अभिनेत्रीच्या इंटिमेट सीनचे फोटो पाहून भडकले नेटकरी; अमिषा पटेल म्हणाली...
अभिनेत्री सिमरत कौरचे (Simrat Kaur) काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Read More
Telly Masala : अतुल परचुरे यांचा कॅन्सरशी लढा ते 'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment : कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Baipan Bhaari Deva : 'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे'; 'बाईपण भारी देवा' सिनेमाच्या यशानंतर कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'च्या टीमने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात हजेरी लावली असून सिनेमाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. Read More
Atul Parchure: 'तुला काहीही होणार नाही, असं माझ्या आईनं मला तेव्हा सांगितलं'; अतुल परचुरे यांचा कॅन्सरशी लढा
अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांची कॅन्सरची झुंज, त्यादरम्यान येणारे अनुभव या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. Read More
Sara Ali Khan: मुंबईमध्ये सारानं केली स्ट्रीट शॉपिंग; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...
साराचा (Sara Ali Khan) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी साराचं कौतुक केलं आहे.  Read More
Ravindra Mahajani Death :  'रुबाबदार अभिनेता हरपला आहे'; राजकीय नेत्यांनी रविंद्र महाजनी यांना वाहिली श्रद्धांजली
Ravindra Mahajani Death :   राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Read More
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; जाणून घ्या 15 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा रिलीजच्या दोन आठवड्यांनंतरही चांगलीच कमाई करत आहे. Read More
Ravindra Mahajani :  'हँडसम नायक, कायम हसतमुख..'; रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर सुबोध भावेची भावूक पोस्ट
सुबोध भावेनं (Subodh Bhave) पोस्टच्या माध्यमातून रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Read More
Shahir Vitthal Umap Birth Anniversary : कोळीगीतांचे बादशहा! शाहीर ठिठ्ठल उमप यांनी गायलेलं पहिलं गीत कोणतं?
Shahir Vitthal Umap : शाहीर विठ्ठल उमप यांची आज जयंती आहे. Read More
Tamannaah Bhatia Vijay Verma Affair: तमन्ना आणि विजयचे अफेअर पब्लिसिटी स्टंट? अभिनेता म्हणाला, 'आम्ही दोघे एकमेकांना...'
'लस्ट स्टोरेज 2' हा चित्रपट  रिलीज झाल्यानंतर  तमन्ना आणि विजयचे अफेअर हा पब्लिसिटी स्टंट आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. Read More
Rakhi Sawant : 'Chandrayaan 3'च्या यशस्वी उड्डाणावर राखी रावंतची प्रतिक्रिया, म्हणाली,"माझ्यामुळे लॉन्च झालं"
Rakhi Sawant On Chandrayaan 3 : 'चांद्रयान 3'च्या यशस्वी उड्डाणावर राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे. Read More
Ravindra Mahajani : मराठी सिनेसृष्टीतील स्टार किड गश्मीर महाजनीला पिकृशोक! राहत्या घरात आढळला अभिनेत्याचा मृतदेह; जाणून घ्या अभिनेते रविंद्र महाजनींबद्दल...
अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याचे वडील रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.