Baby Box Office Collection: 14 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा साऊथ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई
बेबी (Baby) नावाचा एक साऊथ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.
Baby Box Office Collection: गेल्या काही दिवसांपासून अनेक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 100 कोटी, 200 कोटी असे बजेट अनेक चित्रपटांचे असते. पण सध्या एका साऊथ चित्रपटाची चर्चा सुरु आहे, जो 14 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. 14 जुलै रोजी बेबी (Baby) नावाचा एक साऊथ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
बेबी हा साऊथ चित्रपट 14 जुलै रोजी रिलीज झाला. या चित्रपटाच आनंद देवरकोंडानं प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला 7 कोटींची कमाई केली आहे. आता असं म्हटलं जात आहे की, हा चित्रपट बजेटपेक्षा जास्त कमाई करेल आणि या चित्रपटाचं नाव ब्लॉगबस्टर चित्रपटांच्या यादीमध्ये येईल.
बेबी चित्रपटाची गोष्ट
बेबी या चित्रपटात एक लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात लव्ह ट्रअँगल दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी शाळेमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडतात. मुलगा हा गरीब असतो त्यामुळे तो पुढे शिक्षण घेत नाही तर मुलगी पुढे शिक्षणासाठी कॉलेजला जाते. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मुलीची जीवनशैली बदलते तर तिच्या आयुष्यात दुसरा व्यक्ती येतो.
View this post on Instagram
बेबी चित्रपटाची स्टार कास्ट
बेबी चित्रपटामधील अभिनेता आनंद देवरकोंडा हा अभिनेता विजय देवरकोंडाचा भाऊ आहे. आनंदसोबतच बेबी या चित्रपटात वैष्णवी चैतन्य (Vaishnavi Chaitanya),नागेंद्र बाबू, विराज अश्विन (Viraj Ashwin) या कालाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
View this post on Instagram
साऊथ चित्रपटांना मिळतीये प्रेक्षकांची पसंती
गेल्या काही दिवसांपासून साऊथ चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. केजीएफ-चॅप्टर-2,आरआरआर,विक्रम,777 चार्ली,सीता रामम,पोन्नियिन सेल्वन:I ,कांतारा यांसारखे साऊथ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. साऊथ चित्रपट बघायला अनेकांना आवडतात. साऊथ चित्रपटांमध्ये अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका असतो. आगामी साऊथ चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Year Ender 2022: कांतारा ते आरआरआर; 2022 मध्ये साऊथ चित्रपटांचा बोलबाला