Tamannaah Bhatia Vijay Verma Affair: तमन्ना आणि विजयचे अफेअर पब्लिसिटी स्टंट? अभिनेता म्हणाला, 'आम्ही दोघे एकमेकांना...'
'लस्ट स्टोरेज 2' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर तमन्ना आणि विजयचे अफेअर हा पब्लिसिटी स्टंट आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
Tamannaah Bhatia Vijay Verma Affair: अभिनेता विजय वर्मा (Vijay Verma) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia ) यांच्या नात्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांचा 'लस्ट स्टोरेज 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामध्ये तमन्ना आणि विजयची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. 'लस्ट स्टोरेज 2' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर तमन्ना आणि विजयचे अफेअर हा पब्लिसिटी स्टंट आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता विजयने एका मुलाखतीमध्ये या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना दिलं आहे.
एका मुलाखतीमध्ये विजय म्हणाला, 'आम्ही दोघे एकमेकांना डेट करत आहोत. दोघेही एकत्र खूप आनंदी आहेत. मी तिच्या प्रेमात वेडा झालो आहे. माझा व्हिलनच्या भूमिकेचा काळ संपला आहे, आता मी रोमान्सच्या टप्प्यात आहे.'
विजय वर्मासोबतच्या नात्याबद्दल बोलताना तमन्नानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं,"माझं आणि विजयचं नातं खूप खास आहे. भारतात जोडीदारासाठी काही गोष्टी बदलाव्या लागतात. पण विजयने मला मी जशी आहे तसं स्वीकारलं आहे. तो माझी खूप काळजी घेतो. विजय आता माझ्या आनंदाचं कारण झाला आहे. सहकलाकार आहे म्हणून तुम्ही एखाद्याकडे आकर्षित होऊ शकता असे मला वाटत नाही. मी अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. मला असे वाटते की, जेव्हा तुम्हाला एखाद्यासाठी काहीतरी वाटते तेव्हा ते खूप वैयक्तिक असते. तो व्यक्ती काय करतो याच्याशी प्रेमाचा काहीही संबंध नसतो.'
View this post on Instagram
आर बाल्की, सुजॉय घोष, अमित रविंदरनाथ शर्मा आणि कोंकणा सेन शर्मा या चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कथा लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. काजोल, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता या कलाकरांनी देखील लस्ट स्टोरी-2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: