एक्स्प्लोर

Ravindra Mahajani : मराठी सिनेसृष्टीतील स्टार किड गश्मीर महाजनीला पितृशोक! राहत्या घरात आढळला अभिनेत्याचा मृतदेह; जाणून घ्या अभिनेते रविंद्र महाजनींबद्दल...

अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) याचे वडील रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे.

Ravindra Mahajani : आपल्या देखण्या आणि रुबाबदार रुपाने मराठी मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे. 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी सिनेसृष्टीतला 'हँडसम हंक' गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा रविंद्र महाजनी यांचा मुलगा आहे. 

रविंद्र महाजनी काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. सध्या ते पुण्यातील तळेगाव-दाभाडे परिसरात भाड्याने राहत होते. त्यांच्या घरातून दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला तेव्हा ते मृतावस्थेत आढळले. दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

रविंद्र महाजनी कोण आहेत? (Who Is Ravindra Mahajani)

हँडसम फौजदार अभिनेता आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील विनोद खन्ना अशी रविंद्र महाजनी यांची ओळख आहे. बेळगावात जन्मलेल्या रविंद्र महाजनी यांनी नोकरी करण्यासाठी मुंबई गाठली. शिक्षणादरम्यान रविंद्र महाजनी यांना अभिनयाची गोडी लागली होती. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रविंद्र महाजनी यांनी सिनेसृष्टीत नशीब आजमावायला सुरुवात केली. 

रविंद्र महाजनी यांना पहिला सिनेमा कसा मिळाला?

रविंद्र महाजनी यांनी 'जाणता अ जाणता' या मराठी नाटकाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. मिळालेल्या पहिल्या संधीचं रविंद्र महाजनी यांनी सोनं केलं. त्यांची पहिलीच भूमिका खूप गाजली. पुढे 'तो राजहंस एक' हे त्यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक रंगभूमीवर आलं. शांतारामबापूंनी या नाटकाचा प्रयोग पाहिला आणि आपल्या सिनेमासाठी त्यांना विचारणा केली. 'झुंड' असे या सिनेमाचं नाव. 1974 मध्ये आलेल्या या सिनेमाने रविंद्र महाजनी यांना सुपरस्टार केलं. 

रविंद्र महाजनी यांचा सिनेप्रवास जाणून घ्या... (Ravindra Mahajani Movies)

रविंद्र महाजनी यांचा 'झुंड' हा पहिलाच सिनेमा खूप गाजला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.  पहिल्या सिनेमाच्या यशानंतर महाजनींकडे सिने-निर्मात्यांची रांग लागली. 'आराम हराम आहे', 'लक्ष्मी', 'लक्ष्मीची पावलं',' देवता', 'गोंधळात गोंधळ', 'मुंबईचा फौजदार', असे रविंद्र महाजनी यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. तसेच 'सत्तेसाठी काहीही' या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा रविंद्र महाजनी यांनी सांभाळली आहे. 

सत्तरच्या दशकातला 'चॉकलेट बॉय' म्हणून  रविंद्र महाजनी ओळखले जायचे. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवण्यासह हिंदी आणि गुजराती सिनेमांतही त्यांनी काम केलं आहे. सिनेमांचा प्रवाह बदलायला लावणारा कलाकार अशी रविंद्र महाजनी यांची खरी ओळख आहे. रविंद्र आणि गश्मीर यांनी 'पानिपत' आणि 'देऊळ बंद' या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. 

संबंधित बातम्या

मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; पुण्यातील घरात आढळला मृतदेह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget