Entertainment News Live Updates 9 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Ekdam Kadak: 'एकदम कडक' चा टिझर सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ
'एकदम कडक' चित्रपटाच्या टिझरने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार" या डायलॉगने तर सर्वत्र धुमाकूळच घातलाय असे म्हणायला हरकत नाही. 'प्रेम बीम काय नाय बरं का' पासून ते 'प्रेम एकदम कडक हाय' पर्यंतचा प्रवास चित्रपटात पाहणे विशेष ठरणार आहे. तरुण कलाकारांच्या जोडीला ज्येष्ठ कलाकारांचा प्रवासही दमदार आहे हे टिझर वरूनच कळतंय. तर एकदम कडक म्हणत तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या लक्षणीय अभिनेत्रींच्या कामाची पोचपावती टिझरवरून येतेय. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत एकदम कडक चित्रपटातून अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत. चित्रपटाच्या टिझरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली असून येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.
तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
अक्षय विलास बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत हर्षल कामत एंटरटेनमेंट व गोल्डन माउस प्रॉडक्शन निर्मित 'सुमी' (Sumi) या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये आनंदी, मनमुराद हसणारी 'सुमी' (Sumi) दिसतेय. एका महत्वाकांक्षी, ध्येयनिष्ठ मुलीची कहाणी असलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. 'सुमी' 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 मध्ये 'सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' ठरला असून या चित्रपटातील आकांक्षा पिंगळे व दिव्येश इंदुलकर 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 'सुमी'मध्ये स्मिता तांबे, नितीन भजन यांच्याही प्रमुख भूमिका असून अजय गोगावले यांनी या चित्रपटात गाणं गायले असून संगीतकार रोहन-रोहन यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. 'सुमी' लवकरचं प्लॅनेट मराठी ओटीटीच्या (Planet Marathi Ott) माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.
Jitendra Joshi : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर येणार जितेंद्र जोशी
Jitendra Joshi On Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नेहमी वेगवेगळे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थिती लावतात. आता महाराष्ट्राचा लाडका जितेंद्र जोशी हास्याच्या मंचावर उपस्थिती लावणार आहे.
The Crew: 'द क्रू' चित्रपटाची घोषणा; तब्बू, करिना अन् क्रिती साकारणार प्रमुख भूमिका
The Crew: तब्बू (Tabu), करीना कपूर खान (Kareena Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांनी त्यांच्या अभिनयाने आणि मनोरंजक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन नेहमीच जिंकले आहे. आता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर 'लीडिंग लेडीज' कॉमिक कॅपर 'द क्रू' (The Crew) साठी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती 'वीरे दी वेडिंग'च्या सुपरहिट निर्मात्या जोडी एकता आर कपूर आणि रिया कपूर यांनी केली असून, दर्शकांना ड्रामा आणि कॉमेडीचा डोस देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
View this post on Instagram
Bigg Boss Marathi 4: टास्कमध्ये होणार तुफान राडा; बिग बॉसच्या घरात नवा ग्रुप तयार होणार ?
Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये आज यशश्री, रोहित आणि रुचिरा नवा ग्रुप तयार व्हावा यावर चर्चा करताना दिसणार आहेत. यशश्रीचे म्हणणे आहे, मला एक कळत नाहीये जेव्हा सॅम आली होती तुमच्याकडे प्रोपोसल घेऊन कि आपण एक वेगळा ग्रुप तयार करूयात. पण त्याच्या आधीपासून माझ्या डोक्यात होतं ते. मी जेव्हा या ग्रुपमध्ये गेले होते. तेजू, अमृता, तू, मी आणि रोहित असा एक वेगळा ग्रुप असावा त्यात सॅम नव्हती कुठेही. सॅम जरी म्हणत असली ती वैयक्तिक खेळते तरी तिचा कल त्या ग्रुपकडे खूप जास्त आहे आणि ते तिला कधीपण परत खेचून आणू शकतात हे मी पाहिलं आहे. मला असं वाटतं तुम्हालाही खूप ग्रांटेड घेतलं जातं आणि सगळ्याच बाबतीत कि, जेव्हा हवं तेव्हा आपण त्यांना परत खेचून आणू शकतो. रुचिराचे त्यावर म्हणणे आहे, म्हणजे नॉमिनेट करायला आम्ही पाहिजे पण आमची कॅप्टीन्सी, किंवा container शिप गेली तर हे असताना कशी गेली? तिथे त्यांनी ती जपून ठेवली पाहिजे, पण यांना नॉमिनेट करताना आम्ही करू शकतो. आता रुचिराचा नक्की काय मुद्दाच आहे हे कळेलच आजच्या भागामध्ये .
View this post on Instagram
Adarsh shinde : 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाच्या वादादरम्यान आदर्श शिंदेची भावासाठीची पोस्ट व्हायरल
Adarsh Shinde On Vedat Marathe Veer Daudle Saat : महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही राजकीय पक्ष आणि संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. या सिनेमात बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) सूर्याजी दांडकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या भूमिकेला सर्वत्र विरोध होत असताना त्याचा भाऊ आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदेने (Adarsh Shinde) मात्र सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत भावाचं कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
Saleel Kulkarni : लिप सिंकवर सलील कुलकर्णींची नाराजी
Saleel Kulkarni on Live Concert : डॉ. सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) हे मराठीतील नावाजलेले गायक, संगीतकार आणि लेखक आहेत. गेल्या काही दिवसांत संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लाइव्ह कॉन्सर्टदेखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अनेकदा रेकॉर्ड गाणी लावली जातात. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान होणाऱ्या लिप सिंकवर अखेर सलील कुलकर्णीने नाराजी व्यक्त केली आहे.
Salman Khan And Boxer Nikhat Zareen: 'साथिया तूने क्या किया....'; बॉक्सर निखत जरीनसोबत सलमानचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल
Salman Khan And Boxer Nikhat Zareen Dance Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमान त्याच्या स्टाईलनं आणि फिटनेसनं अनेकांची मनं जिंकतो. नुकताच सलमानचा एक खास व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो निखत जरीनसोबत (Nikhat Zareen) डान्स करताना दिसत आहे.
View this post on Instagram