(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ayushyavar Bolu Kahi : ठाण्यात रंगणार 'आयुष्यावर बोलू काही'चा विनामूल्य कार्यक्रम
Ayushyavar Bolu Kahi : ठाण्यात लवकरच 'आयुष्यावर बोलू काही' बहुचर्चित कार्यक्रम होणार आहे.
Ayushyavar Bolu Kahi : ठाण्यात लवकरच 'आयुष्यावर बोलू काही' (Ayushyavar Bolu Kahi) बहुचर्चित कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) आणि सुप्रसिद्ध कवी संदीप खरे (Sandeep Khare) यांचा 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामुल्य असणार आहे.
डॉ. सलील कुलकर्णी यांचा 'एकदा काय झालं' हा सिनेमा 5 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात उर्मिला कानिटकर, सुमीत राघवन, अर्जुन पूर्णपात्रे, मोहन आगाशे, सुहास जोशी अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डॉ. सलील कुलकर्णींचा हा सिनेमा असल्याने 'आयुष्यावर बोलू काही'च्या खास कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवनसह या सिनेमातील कलाकारदेखील उपस्थित राहणार आहेत.
View this post on Instagram
24 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता गडकरी रंगायतनमध्ये प्रेक्षकांना 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान ठाणे आणि विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठान आयोजित व एकदंत थिएटर्स सह-आयोजित हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमाचे डिजिटल पार्टनर स्मृतिगंध आहेत.
"जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही", "दूर देशी गेला बाबा, गेली कामावर आई", "तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं,"सासुरला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये" अशी अनेक लोकप्रिय गाणी प्रेक्षकांना या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहेत.
संबंधित बातम्या