एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 8 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 8 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

YouTubeवर 'कामवाली बाई'ची हवा... सर्वाधिक लोकप्रिय व्हिडीओंच्या यादीत पुण्यातील अपर्णा तांदळे सुपरहिट

मुंबई: यूट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या व्हिडीओंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये टॉप क्रिएटर्सच्या (YouTube Top Creaters List) यादीत कामवाली बाई (Kaamwali Bai Sheela Didi YouTube) हे कॅरेक्टर असलेले शॉर्ट ब्रेक्स (Shorts Break Channel) चॅनेल पहिल्या क्रमांकावर आहे. तब्बल 30 कोटी लोकांनी पाहिलेला अपर्णा तांदळेच्या कामवाली बाईचा 'बारिश में भीगना' हा व्हिडीओ पहिल्या क्रमांकावर आहे. अपर्णा तांदळे ही पुण्याची असून ती सध्या यूट्यूबसह सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

मंत्रालयातील महिलांसाठी 'गोष्ट एका पैठणीची'चे स्पेशल स्क्रिनिंग; सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती

Goshta Eka Paithanichi: नुकताच प्रदर्शित झालेला आणि सध्या चर्चेत असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईत काही ठिकाणी स्पर्धांचे, खेळांचे, बाईक रॅलीचे, लकी ड्रॉचे आयोजनही करण्यात आले. या वेळी बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना, खेळातील विजेत्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. तर काही ठिकाणी या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजनही करण्यात आले. नुकताच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या या चित्रपटाचा मंत्रालयातील महिलांसाठी खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोला महाराष्ट्राचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. 

Jivachi Hotiya Kahili : भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी 'जिवाची होतिया काहिली'

Jivachi Hotiya Kahili : भाषेपलीकडच्या प्रेमावर भाष्य करणारी 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) ही मालिका आहे. मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी या मालिकेत पाहायला मिळत आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. रेवथी आणि अर्जुनचं सत्य अप्पांसमोर येणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वादाने हिंसक वळण घेतलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील वादासाठी कर्नाटक समर्थकांनी आंदोलन केलं आहे. राज्याराज्यांत अशा प्रकारचे वातावरण निर्माण होणं योग्य नाही. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचे वातावरण आहे. सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेली 'जिवाची होतिया काहिली' ही मालिकादेखील महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते. 

12:13 PM (IST)  •  08 Dec 2022

Most Searched South Films : RRR ते KGF 2; 2022 मध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला

Most Searched South Films : गूगने जाहीर केलेल्या सर्वाधिक सर्च केलेल्या 'टॉप 10' सिनेमांच्या यादीत सहा सिनेमे हे दाक्षिणात्य आहेत. या यादीत 'केजीएफ: चॅप्टर 2' (KGF : Chapter 2) हा अॅक्शनपट दुसऱ्या स्थानावर आहे. तर एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा चौथ्या क्रमांकावर आहे. तर ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (Kantara) हा सिनेमा या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. 

11:15 AM (IST)  •  08 Dec 2022

Ranbir Kapoor : रणबीर कपूरचं हॉलिवूडमध्ये पदार्पण?

Ranbir Kapoor : रणबीर पुढे म्हणाला,"बॉलिवूडमध्ये मिळणाऱ्या चांगल्या संधीचा मी स्वीकार करतो. माझी सध्या तरी हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा नाही". हॉलिवूडमध्ये काम करण्याचं रणबीरने स्पष्ट केलं असलं तरी दुसरीकडे मात्र रणबीरची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'द हार्ट ऑफ स्टोन' (The Heart of Stone) हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

10:41 AM (IST)  •  08 Dec 2022

Avatar 2 : 'अवतार : द वे ऑफ वॉटर'ने रिलीजआधीच मोडला 'Doctor Strange 2'चा रेकॉर्ड

Avatar The Way Of Water : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. रिलीजआधीच या सिनेमाने मार्वल यूनिवर्सच्या सुपरहिट 'डॉक्टर स्ट्रेंज 2' (Doctor Strange 2) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Avatar 2 ~ The Way of Water (@avatar2officialmovie)

09:52 AM (IST)  •  08 Dec 2022

Kamlesh Sawant : साळगावकरला मारहाण केल्याने चाहते गायतोंडेवर संतापले

Kamlesh Sawant On Drishyam : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' ( Drishyam 2) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांसोबत सहाय्यक भूमिकेत असणारे कलाकारदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सिनेमात पोलिस अधिकारी गायतोंडेंच्या भूमिकेत असणारा अभिनेता कमलेश सावंतचे (Kamlesh Sawant) एकीकडे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्याला धमक्या आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल्सचा सामना करावा लागला.

View this post on Instagram
 
A post shared by Kamlesh Sawant (@kamleshtukaramsawant)

08:03 AM (IST)  •  08 Dec 2022

Happy Birthday Sharmila Tagore : वयाच्या 13 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणाऱ्या शर्मिला टागोर

Sharmila Tagore : 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांची गणना बॉलिवूडमधील लिजेंड अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. सिनेमांपेक्षा शर्मिला त्यांच्या लूक आणि अदांमुळे नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. आज शर्मिला टागोर त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget