Entertainment News Live Updates 7 February : सिद्धार्थच्या वरातीच्या तयारीला सुरुवात; पाहा फोटो
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Rakhi Sawant : 4 लाख अन् सोनं घेऊन पळाला, पती आदिलवर राखी सावंतचा आरोप
Rakhi Sawant Shocking Allegations On Adil Khan : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सध्या ती पती आदिल खानवर (Adil Khan) केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. राखीने आदिलवर फसवणूक आरोप केले आहेत. चार लाख रुपये अन् सोनं घेऊन पळाल्याचा आरोप राखीनं आदिलवर केला आहे. त्याचप्रमाणे आदिल खान याचे तनु चंदेल हिच्यासोबत अफेअर असल्याचा आरोपही केलाय. त्याशिवाय आदिलसोबत घटस्फोट घेणार असल्याचं राखीनं सांगितलं.
बियर प्यायल्यानंतर, नशेत मारियानं केलं अर्शद वारसीला प्रपोज, कंगाल झाल्यानंतर उचललं हे पाऊल
मुंबई: अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) आणि मारिया गोरेटी यांची लव्हस्टोरी बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. प्रेमात माणूस धर्म, जात, संस्कृती आणि इतर सर्व गोष्टींना बाजूला सारतो, अर्शद आणि मारियाची प्रेमकहाणीही अशीच आहे. दारुच्या नशेत अर्शदची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेन्ड आणि सध्याची पत्नी मारिया गोरेटीने (Maria Goretti) त्याला प्रपोज केलं होतं.
पाकिस्तानानं ज्या चित्रपटावर घातली होती बंदी तो चित्रपट आता भारतात रिलीज होणार
Joyland: जॉयलँड (Joyland) हा पाकिस्तानी (Pakistan) चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ऑस्करमधील (Oscar) बेस्ट इंटरनॅशनल फिचर या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्टेड करण्यात आलं आहे. जॉयलँडचे दिग्दर्शन सॅम सादिक (Saim Sadiq) यांनी केलं आहे. 'जॉयलँड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमावर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली. पण नंतर ही बंदी हटवण्यात आली. या चित्रपटाचं अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) देखील कौतुक केलं होतं. आता हा चित्रपट भारताबरोबरच इतर काही देशांमध्ये देखील रिलीज होणार आहे.
Ghoda Trailer : कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट सांगणारा 'घोडा'
Ghoda Marathi Movie : 'घोडा' (Ghoda) या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट 'घोडा' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहे.
Selfiee Song Kudiyee Ni Teri Teaser: अक्षयचे सिक्स पॅक्स अन् मृणालचा ग्लॅमरस अंदाज; 'सेल्फी' मधील गाण्याचा टीझर रिलीज
Selfiee song Kudiyee Ni Teri teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा सेल्फी (Selfiee) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील 'कुडीये नी तेरी' (Kudiyee Ni Teri) या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'कुडीये नी तेरी' गाण्याचा 17 सेकंदाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
Sidharth Malhotra Kiara Advani: सिद्धार्थ- कियाराच्या लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या मोबाईलला लावण्यात येणार हे कव्हर? पाहा व्हिडीओ
Sidharth Malhotra Kiara Advani: अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांच्या मोबाईलला कव्हर लावण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे. Viral Bhayani नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या मोबाईल कव्हरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
Adil Durrani Arrested : राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हज
Rakhi Sawant Husband Adil Khan Durrani Arrested : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्रीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राखीने तिचा पती आदिल खान दुर्राणी (Adil Khan Durrani) विरोधात तक्रार दाखल केली होती. आता तिच्या तक्रारीची दखल घेत मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी आदिल खानला ताब्यात घेतलं आहे.
Mumbai: Actor Rakhi Swant files a complaint against her husband Adil Durrani at Mumbai's Oshiwara PS alleging he has taken her money and jewellery. Police have filed an FIR under IPC Sec 406 & 420 against Adil Durrani. He has been called for questioning: police
— ANI (@ANI) February 7, 2023
Sidharth Malhotra Kiara Advani: सिद्धार्थच्या वरातीची तयारी; पहा फोटो
Sidharth Malhotra Kiara Advani: अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. सिद्धार्थच्या वरातीची तयारी करण्यात आली आहे. जैसलमेरमधील किशनघाट येथून सिद्धार्थ मल्होत्राच्या वरातीसाठी घोडी आणण्यात आली आहे. पहा त्याच्या वरातीचा फोटो:
Kantara : बॉक्स ऑफिसवर पुन्हा 'कांतारा'चा बोलबाला; सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण होताच ऋषभ शेट्टीने केली प्रीक्वलची घोषणा
Rishabh Shetty Announced Kantara Prequel : 'कांतारा' (Kantara) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतेच या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले आहेत. आता सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण होताच या सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने (Rishabh Shetty) या सिनेमाच्या प्रीक्वलची घोषणा केली आहे.
View this post on Instagram