एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 3 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 3 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत. 

Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या फोटोने पुन्हा उजळला बुर्ज खलिफा

Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) नुकताच 57 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाहरुखनेही चाहत्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) चित्रपटाचा टीझर रिलीज केला. त्याचवेळी किंग खानचा वाढदिवस खास बनवण्यासाठी दुबईतील बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) पुन्हा एकदा त्याचे अभिनंदन करण्यात आले. शाहरुखला बुर्ज खलिफावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची ही सलग पाचवी वेळ आहे. 

Himesh Reshammiya: हिमेश रेशमियाचं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन

Himesh Reshammiya:  प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक  हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya)  हा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. सध्या तो इंडियन आयडॉल 13 (Indian Idol 13) या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारतो. हिमेश हा अभिनय क्षेत्रात देखील काम करतो. आता त्याचा द एक्सपोज या फ्रँचायजीमधील  ‘BADASS रविकुमार’ (Badass RaviKumar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून तो आता पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे. 

शार्क टँक इंडिया 2 च्या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हर नसल्यानं नेटकऱ्यांचा संताप

Shark Tank India Season 2:   शार्क टँक इंडिया  (Shark Tank India) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. स्वत:चा व्यवसाय सुरू करणारे लोक त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन या शोमध्ये लोक येतात. त्यामधील काही कल्पना या अतरंगी देखील असतात.  या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  ‘शार्क टँक इंडिया 2’(Shark Tank India Season 2) चा प्रोमो काल (2 नोव्हेंबर) रिलीज झाला. या प्रोमोमध्ये  अश्नीर ग्रोव्हर हे  नसल्यानं आता नेटकरी भडकले आहेत. 

अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता मिलिंद गुरव झळकणार रूपेरी पडद्यावर

 कोकणातल्या मातीतला अस्सल मालवणी अभिनेता 'मिलिंद गुरव' (Milind Gurav) प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. एकांकिका, नाटक, शॉर्ट फिल्म करत आपल्या अभुतपूर्व भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता मिलिंद पहिल्यांदाच 'प्रेम प्रथा धुमशान' (Prem Pratha Dhumshan) या सिनेमातून खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 4 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाला कोकणप्रेमी चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

13:26 PM (IST)  •  04 Nov 2022

Prashant Damle : मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ प्रशांत दामलेंचा विक्रमी प्रयोग

Prashant Damle : मराठी रंगभूमीवरील ‘बुकिंगचा सम्राट’ अशी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची ओळख आहे. गेल्या तीन दशकांत मोरू, माधव, मन्या, केशव, डॉ. पुंडलिक, बहरूपी, राजा, फाल्गुनराव अशा अनेक भूमिकांच्या माध्यमातून प्रशांत दामले प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकताच प्रशांत दामलेंनी 12,500 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. 

12:41 PM (IST)  •  04 Nov 2022

Anshuman Jha Wedding : 'मस्तराम' फेम अंशुमन झा अडकला लग्नबंधनात

Anshuman Jha Wedding : 'मस्तराम' फेम अभिनेता अंशुमन झा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अंशुमन झाने मंगेतर सिअरा विंटर्ससोबत अमेरिकेत लग्न केलं आहे. लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Anshuman Jha (@theanshumanjha)

12:40 PM (IST)  •  04 Nov 2022

Bigg Boss Marathi 4 : सर्वाधिक लगोरीचे थर कोण रचणार? स्पर्धकांमध्ये पार पडणार कॅप्टीन्सीचे कार्य

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 4) एक वेगळा चाहतावर्ग आहे. पण प्रेक्षकांमध्ये बिग बॉस मराठीची क्रेझ कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा वादग्रस्त कार्यक्रम मागे पडला आहे. अशातच आज बिग बॉसच्या घरात एक महत्त्वपूर्ण टास्क रंगणार आहे. सर्वाधिक लगोरीचे थर रचणाऱ्या सदस्याला कॅप्टन बनण्याचा मान मिळणार आहे.

10:42 AM (IST)  •  04 Nov 2022

Bebhaan : 'बेभान'चा ट्रेलर लॉंच

Bebhaan : रोमान्स आणि अॅक्शनचा पुरेपूर मसाला प्रेक्षकांना 'बेभान' (Bebhaan) या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे. अनुपसिंग ठाकूर, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे असा प्रेमत्रिकोण असलेला 'बेभान' हा सिनेमा 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. 

09:48 AM (IST)  •  04 Nov 2022

Shivpratap Garudzep : 'शिवप्रताप गरुडझेप'ची गर्जना आता ओटीटीवर घुमणार

Shivpratap Garudzep : विजयादशमीच्या मुहुर्तावर 5 ऑक्टोबरला ‘शिवप्रताप-गरुडझेप’ (Shivpratap Garudzep) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता घरबसल्या 'शिवप्रताप गरुडझेप'चा थरार अनुभवायला मिळणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by शिवप्रताप_गरूडझेप (@shivpratap_garudjhep)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget