एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 30 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 30 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Vaishnavi Kalyankar: वैष्णवी कल्याणकर करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण

Vaishnavi Kalyankar: विविध मालिकांमधून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar).  अल्पावधितच वैष्णवीने प्रेक्षकांना आपलेसे केले. आता वैष्णवी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच तिची चित्रपटातील झलक सोशल मीडियावर झळकली आहे. सरळ, साधी, सालस असणारी ही 'झुळूक' तरुणांना भावणारी आहे. 

Tunisha Sharma: रामदास आठवले यांनी घेतली तुनिषा शर्माच्या कुटुंबियांची भेट

Tunisha Sharma: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषा  'अलिबाबा दास्तान ए काबुल' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तुनिषानं 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. नुकतीच केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी तुनिषाच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी तुनिषाच्या आईनं रामदास आठवले यांच्याकडे 'शिझान खानला कठोर शिक्षा द्या.', अशी मागणी केली. 

Riya Kumari: पती आणि मुलीसमोर अभिनेत्री रिया कुमारीची हत्या

Jharkhand Actress Riya Kumari: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली. आता आणखी एका अभिनेत्रीच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. झारखंडमधील (Jharkhand) प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची (Riya Kumari) गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रिया कुमारी ही तिच्या पती आणि मुलीसोबत प्रवास करत होती, तेव्हा ही घटना घडली. काही लोकांनी रियाची (Jharkhand Actress Riya Kumari) कार थांबवत तिला लुटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रियावर लूटमार करणाऱ्यांनी गोळी झाडली, त्यात तिचा मृत्यू झाला. 

Sheezan Khan: शिझान खानच्या अडचणीत वाढ

Sheezan Khan: अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) हा पोलीस कोठडीत आहे. आरोपी शिजान खान याला वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात हजर केले होते. शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 30 तारखेपर्यंत शिझान खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

 

 

18:03 PM (IST)  •  30 Dec 2022

Tunisha Sharma Suicide Case : तुनिषाची आत्महत्त्या नाही हत्त्याच;अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईचा शिझानवर आरोप

Tunisha Sharma Suicide Case : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईने आज आपल्या रहात्या घरी पञकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी तुनिषाने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. शिजानला शिक्षा व्हावी आपली इच्छा असल्याच म्हटलं आहे.

तुनिषाला हिजाब घालण्यासाठी शिझान खानकडून प्रवृत्त केले जात होते. तसेच उर्दु शिकवण्यासाठीही तो तिला सांगायचा. तिला सेटवर असताना मारहाणही शिझानने केल्याचा गंभीर आरोप तुनिषाच्या आईने आज पत्रकार परिषदेत केला आहे. तुनिषा ख्रिसमस सुट्टीत चंदीगडाला जाणार होती. ती खुश होती. मग आत्महत्येपूर्वी 15 मिनिटे अशी काय चर्चा झाली जी तिच्या आयुष्यातील शेवटची ठरली. आत्महत्येनंतर 15 मिनिटे अँम्ब्युलन्स उशीराने आली. शिझान खानने स्वतः तुनिषाला आत्महत्या केल्यानंतर उतरवलं होतं. त्यामुळे काहीतरी घडल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला असून, त्यावर चौकशीची मागणी केली आहे. तुनिषा माझ्यावर कधीच नाराज नव्हती. शिझानची बहीण तुनिषाला नेहमी शिझान खानच्या घरी घेऊन जात होती. तुनिषा शिझानवर तसेच त्याच्या घरच्यांवर जास्त पैसे खर्च करायची. शिझानला महागड्या वस्तू गिफ्ट द्यायची. आरोपी शिझानने तिचा फायदा घेतल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. मला टॅटू काढणे, कुत्रा पाळणे आवडत नव्हतं. तरीसुध्दा तुनिषाने शिझानसाठी स्वतःच्या शरीरावर love of everything चा टेटु सुद्धा बनवला होता. आणि कुत्रासुध्दा पाळला होता.   तुनिषा ही कधीच डिप्रेशनमध्ये नव्हती. तुनिषा आत्महत्या करणारी मुलगी नव्हती ती निष्पाप मुलगी होती. शिझानने तिचा वापर केल्याचा आरोप करत, शिझान खानला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी तुनिषाचा आईने केली आहे. शिझान खान तुनिषाबरोबर प्रेमाचे संबंध ठेवून, दुस-या मुलीशीही प्रेम करायचा, त्यांच्याशी चॅट करायचा. आणि तेच चॅट तुनिषाने बघितलं होतं. आत्महत्येच्या एक दिवस अगोदर तुनिषाची आई शिझानला समजवण्यासाठी गेली होती. त्यावेळीही तो तुनिषाच्या आईशी उर्मटपणे बोलला होता. शिझानला त्याने मी काही करु शकत नाही, तुला काय करायचं आहे ते कर असं म्हटल्याचंही तुनिषाच्या आईने सांगितलं होतं. मी तुनिषावर खूप प्रेम करायची, माझी एकुतली एक मुलगी होती. शिझान खानने तुनिषाला त्यांच्या ब्रेकअपच्या दिवशी कानाखाली मारल्याचाही आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. शिझानसोबतच शिझानच्या कुटुंबियांनाही आपण जबाबदार मानत असल्याचं शिझानच्या आईने सांगितलं आहे.

 

14:05 PM (IST)  •  30 Dec 2022

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात तेजस्विनी लोणारीची पुन्हा एन्ट्री

Tejaswini Lonari On Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या पर्वातील सर्वांची लाडकी स्पर्धक अर्थात तेजू 'बिग बॉस'च्या घरातून दुखापत झाल्याने बाहेर पडली होती. त्यामुळे तिचे चाहते नाराज झाले होते. आता तेजस्विनीने पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेतली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

13:20 PM (IST)  •  30 Dec 2022

Aata Hou De Dhingana : आता कलाकारांचा होणार कल्ला; स्टार प्रवाहच्या कलाकारांबरोबर होणार नवीन वर्षाचं स्वागत

Aata Hou De Dhingana : नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. अशातच स्टार प्रवाहवरील 'आता होऊ दे धिंगाणा' हा कार्यक्रमानेही कोणतीही कसर सोडली नाही. कारण नवीन वर्षाचा स्वागतासाठी आता स्टार प्रवाहच्या मालिकेतील सर्व कलाकार एकाच मंचावर अवतार आहेत. सोबतच अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख 'वेड' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. या दरम्यान प्रेक्षकांना डबल मस्ती, डबल मजा पाहायला मिळणार आहे. 


12:28 PM (IST)  •  30 Dec 2022

Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळेंचा बहुप्रतीक्षित 'घर बंदूक बिर्याणी' लवकरच येणार भेटीला

Ghar Banduk Biryani : 'घर बंदुक बिर्याणी' (Ghar Banduk Biryani) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

12:00 PM (IST)  •  30 Dec 2022

Tunisha Sharma Death Case : तुनिशाची आत्महत्या नव्हे तर हत्या झाली, आईकडून संशय व्यक्त

Tunisha Sharma Death Case Update : अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. अशातच आता तिच्या आईने पत्रकार परिषद घेत शिझानवर (Sheezan Khan) अनेक आरोप केले आहेत. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी शिझानने तुनिषावर दबाव टाकला होता. तिच्याशी जवळीक वाढवली गेली आणि नंतर अचानक तिचा विश्वासघात करण्यात आला, असा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आआरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आआरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
हिटमॅन आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी, रोहित शर्मा बाद होताच मुंबईला मोठा धक्का
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
Embed widget