एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 3 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 3 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Anupam Kher : द काश्मीर फाइल्स'ची गोष्ट माझ्यासह अनेक लोकांची, नदाव लॅपिड यांचं वक्तव्य चुकीचं : अनुपम खेर

Anupam Kher : 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील गोष्ट फक्त माझीच नाहीये तर माझ्यासारख्या अनेक लोकांची आहे. ज्यांना आपल्या घरातून जबरदस्तीने हाकलून देण्यात आले. त्यावेळी अनेक महिलांवर अमानुष अत्याच्यार करण्यात आले. अलीकडेच ज्युरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाबाबत एक व्यक्तव्य केलं. परंतु, त्यांचं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे, असं मत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher)  यांनी व्यक्त केलंय. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अुपम खेर यांनी त्यांच्या करिअरच्या स्ट्रगलविषयी देखील मन मोकळ्या गप्पा मारल्या. 

Jubin Nautiyal : लोकप्रिय गायक जुबिन नौटियालचा अपघात

लोकप्रिय गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) जिन्यांवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी घडली. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जुबिनची कोपर फ्रॅक्चर झाली आहे. मात्र, बिल्डींगच्या पायऱ्यांवरून खाली उतरत असताना त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. जुबिन नौटियाल अलीकडच्या काळात 'तू सामना आये', 'माणिके' आणि 'बना शराबी' सारख्या लोकप्रिय ट्रेडिंग गाण्यांसाठी प्रसिद्धीच्या झोतात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झाल्यानंतर जुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

रणवीर सिंहच्या 'सर्कस'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) आगामी चित्रपट 'सर्कस' (Cirkus) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. या चित्रपटात रणवीर सिंह (Ranveer Singh) मुख्य भूमिकेत आहे. गेल्या आठवड्यात निर्मात्यांनी 'सर्कस'चे पोस्टर आणि एक मजेशीर व्हिडीओ क्लिप शेअर करून चित्रपटातील कलाकारांच्या लूकची झलक शेअर केली होती. त्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्याचबरोबर सर्कसचा ट्रेलरही मुंबईत लाँच करण्यात आला आहे. ट्रेलर लाँचच्या आधी, सर्कस कलाकारांनी लाल रंगाच्या पोशाखात लोकप्रिय गाणे, ईना मीना डीका देखील रिक्रिएट केले आहे.

20:16 PM (IST)  •  03 Dec 2022

Har Har Mahadev Movie : हर हर महादेव चित्रपटाचा वाद चिघळणार; छत्रपती संभाजीराजे आणि स्वराज्य संघटनेचा आक्रमक पवित्रा

Har Har Mahadev Movie : 'हर हर महादेव' हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला आणि तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत #स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. 

14:36 PM (IST)  •  03 Dec 2022

Apurva Agnihotri Shilpa Baby : अपूर्व अग्निहोत्री आणि शिल्पा सकलानीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

Apurva Agnihotri Shilpa Baby : बॉलिवूड अभिनेता अपूर्व अग्निहोत्री (Apurva Agnihotri) आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी (Shilpa Saklani) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय जोडपं आहे. आता लग्नाच्या 18 वर्षानंतर ते आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Apurva Agnihotri (@apurvaagnihotri02)

13:17 PM (IST)  •  03 Dec 2022

Daar Ughad Baye : मुक्ता देणार का पुरुषी मक्तेदारीला छेद?

Daar Ughad Baye : 'दार उघड बये' (Daar Ughad Baye) ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. येत्या 5 डिसेंबरपासून या मालिकेचा अॅक्शन पॅक आठवडा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. पुरुषी मक्तेदारीला छेद देत घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुक्ता झटणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत प्रेक्षकांना नव-नविन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

12:17 PM (IST)  •  03 Dec 2022

Sumeet Raghavan : सुमीत राघवणने आरे आंदोलकांवर साधला निशाणा

Sumeet Raghavan : अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो. गोरेगाव येथील आरे कारशेड प्रकल्पाला सुरुवातीपासूनच त्याने पाठिंबा दर्शवला आहे. आता पुन्हा एकदा त्याने यासंदर्भात एक वादग्रस्त ट्वीट केलं आहे. 

12:09 PM (IST)  •  03 Dec 2022

Shah Rukh Khan: शाहरुखला पाहताच हॉलिवूड अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही शाहरुखचे चाहते आहेत. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. शाहरुखनं सौदी अरेबिया येथील रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये शाहरुखला सन्मानित करण्यात आलं. नुकताच या कार्यक्रमातील शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून व्हिडीओमधील एका हॉलिवूड अभिनेत्रीच्या रिअॅक्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by SRK VIBE (@_srkvibe)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 February 2025Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानीSpecial Report | Uddhav Thackeray | ठाकरेंकडून शिंदेंना शिंगावर, फडणवीसांना डोक्यावर?Zero Hour | Swarget Bus Depo News | 'शिवशाही'त बलात्कार एसटीचं 'वस्रहरण',झीरो अवर शोमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Embed widget