Entertainment News Live Updates 29 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि कॉंग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांना ओळखले जायचे.
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आमिर खान एका पंजाबी सरदारच्या भूमिकेत दिसत आहे. आमिरसोबत करीना कपूरदेखील (Kareena Kapoor) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
7 व्या 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला (Mumbai International Film Festival) आजपासून सुरुवात झाली आहे. 29 मे ते 5 जून दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची अनेक सिनेप्रेमींची इच्छा आहे. तर चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना पाहायची संधी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळते. त्यामुळे प्रेक्षक या महोत्सवात जाण्याची उत्सुकतेने वाट पाहत असतात. सिनेप्रेक्षक http://miff.in या लिंकवरून तिकीट बुक करू शकतात. अथवा miffindia@gmail.com यावर संपर्क साधू शकतात.
मल्याळम संगीत जगताने दिग्गज पार्श्वगायक गमावले आहेत. पार्श्वगायक एदवा बशीर (Edava Basheer) यांचे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन झाले आहे. 28 मे 2022 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी एदवा बशीर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे दिग्गजांसह चाहत्यांकडून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
आमिर खानच्या (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी हा सिनेमा सज्ज झाला आहे. हा सिनेमा 'केजीएफ 2'चा रेकॉर्ड मोडू शकतो, असेही म्हटले जात आहे. 11 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिरचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा फ्लॉप झाला होता. त्यामुळे प्रेक्षक 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. बॉक्स ऑफिसवर 'लाल सिंह चड्ढा' यशस्वी होण्याची पाच कारणे आहेत.
शिवरायांच्या इतिहासातली त्यांच्या सरसेनापतींची गाथा सांगणारा 'सरसेनापती हंबीरराव' हा सिनेमा आहे.
'माझी माणसं' (Majhi Mansa) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका सनमराठीवर सुरू होणार आहे. स्वकर्तृत्वावर घर सांभाळणाऱ्या गिरीजाची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘रान बाजार’ या सीरीजसाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्रचंड मेहनत घेतली आहे. या सीरीजमध्ये प्राजक्ताने ‘रत्ना’ नावाचे पात्र साकारले आहे. वारांगणा असलेली रत्ना साकारण्यासाठी प्राजक्ताने प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘रत्ना’ प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्राजक्ताने अभिनयापासून ते देहबोलीपर्यंत सगळ्याचाच बारकाईने अभ्यास केला. या भूमिकेसाठी तिला स्वतःचे वजन देखील वाढवावे लागले होते. प्राजक्ताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे.
Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. अनेक चित्रपटांना मागे टाकत आता भूल भुलैया 2 यशस्वी कमाई करत आहे. ‘भूल भुलैया 2’ने आता नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रिलीजच्या अवघ्या 9व्या दिवशी हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
या चित्रपटाने शनिवारी 11.35 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यासह चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 9 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘भूल भुलैया 2’ने आतापर्यंत एकूण 109.92 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
आज (29 मे) बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या चाहत्यांना आगामी 'लाल सिंह चढ्डा' या चित्रपटाची झलक दाखवणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dr. Sultana Begum Passes Away : प्रसिद्ध कवयित्री डॉ. सुलताना बेगम (Dr. Sultana Begum) यांचे शनिवारी दिर्घ आजाराने पटियाला येथे निधन झाले आहे. डॉ. सुलताना बेगम या 72 वर्षांच्या होत्या. रविवारी पंजाबी संस्कृती नारी विरसा मंचच्या भाषा विभागात आयोजित कार्यक्रमात त्या विशेष पाहुण्या म्हणून सहभागी होणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच त्या असह्य झाल्या. डॉ. बेगम यांच्या प्रमुख काव्यसंग्रहांमध्ये कतरा-कतरा जिंदगी, लाहोर किनी दूर, शिगुफे, गुलजारन आणि बहारन इत्यादींचा समावेश आहे. पंजाब शालेय शिक्षण मंडळाच्या उपसंचालक पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या.
Elon Musk on Johnny Depp Vs Amber Heard : हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि पूर्वाश्रमीची पत्नी अभिनेत्री एम्बर हर्ड (Amber Heard) यांच्यातील सुरू असलेल्या मानहानीचा खटला चांगलाच चर्चेत आहे. खटल्यादरम्यान अनेक गोष्ट समोर येतं असून त्यावर चर्चा सुरू आहे. आता या हॉलिवूड जोडप्याच्या भांडणात टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांचं नवं ट्विट समोर आलं आहे. टेस्लाचे मालक अब्जाधीश एलॉन मस्क यांनी ट्विट करत या दोघांना अविश्वसनीय म्हटलं आहे आणि आशा व्यक्त केली आहे की दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे जातील.
Jacqueline Fernandez : दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) 31 मे ते 6 जून या कालावधीत अबू धाबीला जाण्याची परवानगी दिली आहे. 28 मे रोजी जॅकलीनने अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्समध्ये जाण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. याआधीही जॅकलिनने 17 मे ते 28 मे दरम्यान अबुधाबी, दुबई, फ्रान्स आणि नेपाळला जाण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. ज्याला ईडीने विरोध केला आणि नंतर जॅकलिनने अर्ज मागे घेतला.
Hrithik Roshan : दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या (Yash) KGF 2 चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. दुसऱ्या भागाच्या यशानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली होती की ते लवकरच चित्रपटाचा तिसरा भाग (KGF 3) प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. आता असे म्हटले जात आहे की, केजीएफच्या तिसऱ्या भागासाठी निर्मात्यांनी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनशी (Hrithik Roshan) संपर्क साधला आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात हृतिक रोशन यशसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बातमी समोर आल्यापासून या दोन स्टार्सना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
आता KGF च्या निर्मात्यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. KGF च्या प्रोडक्शन हाऊस Hombale Films चे सह-CEO विजय किरांगदूर यांनी एका मुलाखतीत हृतिकला कास्ट करण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. या वर्षी KGF चॅप्टर 3 केला जाणार नाही असे त्याने म्हटले आहे.
Bunny Marathi Movie : आपला चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी चित्रपटाचे निर्माते कलावंत वेगवेगळ्या कल्पक योजना आखतात, ठिकाणं निवडतात. आपलं प्रमोशन इतरांपेक्षा वेगळं असावं, रसिकांनी त्याची दखल घेऊन आपली कलाकृती पहाण्याची उत्सुकता दाखवावी, चार कौतुकाचे शब्द बोलावेत यासाठी हा सगळा प्रपंच सुरू असतो. अशीच एक चमकदार कल्पना अखून निर्माते शंकर धुरी आणि दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांनी ती प्रत्यक्षात उतरवली देखील आहे.
‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित 'बनी' (Bunny) या चित्रपटाचा फर्स्टलूक 75व्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’दरम्यान (Cannes Film Festival 2022) 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये करण्यात आला. या मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आणि चित्रपटाचे पोस्टर उघडताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली.
Samrat Prithviraj : या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) अभिनीत ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) चित्रपट शीर्षकावरून बराच काळ वादात अडकला होता. प्रचंड टीका आणि विरोधामुळे, निर्मात्यांनी नुकतेच या चित्रपटाचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. आता या ऐतिहासिक चित्रपटाचे नाव बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) करण्यात आल्याची माहिती निर्मात्यांनी नुकतीच दिली होती. अधिकृतपणे चित्रपटाचे शीर्षक बदलल्यानंतर, निर्मात्यांनी आता चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेन्ण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
कान्स चित्रपट महोत्सवात भारताच्या All That Breathes माहितीपटाला पुरस्कार
'कान्स चित्रपट महोत्सवा'ची (Cannes 2022) आज सांगता होणार आहे. 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय सिनेतारकांसह सिनेमांचादेखील दबदबा आहे. कान्स चित्रपट महोत्सवात आता दिग्दर्शक शौनक सेन (Shaunak Sen) यांच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) या माहितीपटाने गोल्डन आय अवॉर्ड (Golden Eye) पटकावला आहे.
'ऑल दॅट ब्रीथ्स' हा माहितीपट 'कान्स 2022'च्या आधी एचबीओ चॅनलवर दाखवण्यात आला होता. तेव्हा हा माहितीपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता कान्स चित्रपट महोत्सवात शॉर्ट फिल्म कॅटेगरीत या माहितीपटाला 'गोल्डन आय अवॉर्ड' मिळाला आहे. त्यामुळे या माहितीपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. गोल्डन आय ज्युरी सदस्य अॅग्निएस्का हॉलंड, इरिना त्सिल्क, पियरे डेलडोनचॅम्प्स आणि अॅलेक्स व्हिसेंट यांनी हा माहितीपट दिल्लीच्या प्रदूषणावर आधारित एक उत्कृष्ट माहितीपट असल्याचे म्हटले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाला फिलाडेल्फिया येथील वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सनडांस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणारा हा 90 मिनिटांचा एकमेव हिंदी माहितीपट आहे. दोन भावांवर भाष्य करणारा हा माहितीपट आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. तसेच सहा भारतीय सिनेमांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा सिनेमांत मराठी सिनेमांचादेखील समावेश आहे. 'पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona), ‘गोदावरी’ (Godavari) या मराठी सिनेमांना 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. यंदाचा महोत्सव खास आहे. सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा सिनेमादेखील 'कान्स फिल्म फेस्टिवल 2022' मध्ये दाखवला जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -