एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa 2 BO Collection : बॉक्स ऑफिसवर दिसली कार्तिक आर्यनची जादू, ‘भूल भुलैया 2’ने पार केला 100 कोटींचा टप्पा!

Bhool Bhulaiyaa 2 : रिलीजच्या अवघ्या 9व्या दिवशी हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा चित्रपट ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. अनेक चित्रपटांना मागे टाकत आता भूल भुलैया 2 यशस्वी कमाई करत आहे. ‘भूल भुलैया 2’ने आता नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रिलीजच्या अवघ्या 9व्या दिवशी हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

या चित्रपटाने शनिवारी 11.35 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. यासह चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या 9 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘भूल भुलैया 2’ने आतापर्यंत एकूण 109.92 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

पहिल्या दिवसापासून जबरदस्त कलेक्शन

‘भूल भुलैया 2’ पहिल्या दिवसापासून रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. ‘भूल भुलैया 2’ने पहिल्या दिवशी 14.11 कोटी कमाई करत बॉक्स ऑफिसवर कल्ला केला होता. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असून, तुफान वेगाने पुढे जात आहे. 'भूल भुलैया 2'च्या क्रेझसमोर कंगना रनौतचा ‘धाकड’ मात्र फिका पडला आहे. कंगनाचा बहुप्रतीक्षित ‘धाकड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. 

कार्तिक आणि कियारा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 2’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा दुप्पट कामगिरी करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे बहुतांश शो हाऊसफुल्ल जात आहेत. कार्तिक आणि कियारा देखील त्यांच्या चित्रपटाच्या यशामुळे खूप खुश आहेत.

सेलिब्रिटींकडून चित्रपटाचे कौतुक

'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकने 15 कोटी मानधन घेतले आहे. तर, कियारा आडवाणीने या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे. कियाराने या चित्रपटासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतले आहे. अनेक सेलिब्रिटींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. अभिनेत्री कंगना रनौतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा :

PHOTO : ब्युटी इन ब्लॅक, कान्सच्या रेड कार्पेटवर तमन्ना भाटियाचा जलवा!

Sriya Lenka: ऑडिशन दिली, ऑनलाईन कोरियन भाषा शिकली, भारताची पहिली के-पॉप स्टार ठरली श्रिया लेंका!

Hrithik Roshan, KGF 3 : ‘केजीएफ 3’मध्ये हृतिक रोशनची वर्णी? वाचा काय म्हणाले मेकर्स...

महत्त्वाच्या बातम्या

Neena Gupta Pregnant At 67 Age: नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
नीना गुप्ता म्हणाल्या, 'होय, मी गरोदर...', वाढलेल्या पोटावरुन सततच्या प्रश्नांना वैतागून उत्तर
Paresh Rawal On Gujarat Hosting 72nd National Film Awards: 'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
'गुजरात पाकिस्तानात आहे का?'; परेश रावल यांचा 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन सुरू असलेल्या वादावर संताप
Sharat Saxena 6 Hour Spine Surgery: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यावर तब्बल 6 तासांची शस्त्रक्रिया, उठणं-बसणंही झालेलं अवघड, अवस्था पाहून हादरलेले फॅन्स, आता प्रकृती कशी?
Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
Video: कॅनडात पोलिसांनी भारतीय वंशाच्या घरमालकिणीला घरात जाऊन बेड्या ठोकल्या, भाडेकरुच्या रुममध्ये दादागिरी करत घुसली अन् बार्बेक्यूवर शिजवलेलं बीफ फेकून दिलं!
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
मोदी ब्रिक्समध्ये म्हणाले, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणे ही आमची दृष्टी; इराण, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यात मतभेद असूनही, संयुक्त निवेदनावर सहमती
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
मनोज जरांगेंच्या चलो मुंबई आंदोलनावर महायुतीतून पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचा विश्वासू नेता म्हणाला...
Chandrashekhar Bawankule on OYO rooms:ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
ओयो रुमबाबतचे नियम आणखी कडक करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत, विश्वास नांगरे पाटलांचं कौतुक, म्हणाले...
Embed widget