Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसचा परदेशी जाण्याचा मार्ग मोकळा, मात्र ‘ही’ अट पाळावी लागणार!
Jacqueline Fernandez : दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) अबू धाबीला जाण्याची परवानगी दिली आहे.
Jacqueline Fernandez : दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) 31 मे ते 6 जून या कालावधीत अबू धाबीला जाण्याची परवानगी दिली आहे. 28 मे रोजी जॅकलीनने अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्समध्ये जाण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. याआधीही जॅकलिनने 17 मे ते 28 मे दरम्यान अबुधाबी, दुबई, फ्रान्स आणि नेपाळला जाण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. ज्याला ईडीने विरोध केला आणि नंतर जॅकलिनने अर्ज मागे घेतला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणात त्याच्याविरुद्ध जारी केलेली लुकआउट नोटीस (एलओसी) निलंबित राहील. न्यायालयाने तिला 50 लाख रुपयांची मुदत ठेव पावती (एफडीआर) 50 लाख रुपयांच्या जामीनासह प्रवासादरम्यानच्या मुक्कामाचा तपशील आणि परतीची तारीख सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, तिला भारतात परत आल्यावर तपास यंत्रणेला कळवावे लागेल.
200 कोटींच्या खंडणीप्रकरणी जॅकलिनची चौकशी सुरु
अबुधाबीमध्ये होणारा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला असून, त्यामुळे नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल केला जाईल, असे जॅकलिनच्या वकिलांनी सांगितले होते. एजन्सीने जॅकलिनच्या परदेशात जाण्याच्या विनंतीला विरोध केला आणि सांगितले की सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या खंडणीप्रकरणी जॅकलिनची चौकशी केली जात आहे. मात्र, ती अजूनही योग्य माहिती देत नाहीय. या प्रकरणात एजन्सीने 7.25 कोटींची मालमत्ताही जप्त केली आहे. एजन्सीला असा संशय आहे की, जॅकलिन परदेशात जात आहे आणि म्हणूनच जॅकलिनसाठी यापूर्वी देखील एक लुक आउट नोटीस जारी करण्यात आली होती. या सुनावणीवेळी अभिनेत्री जॅकलिनही कोर्टात हजर होती.
सुकेशची रवानगी तुरुंगात
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. त्यामुळे ईडीने तिची जवळपास 7 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, जी तिला सुकेश चंद्रशेखर याने तिला भेट म्हणून दिली होती. सुकेश चंद्रशेखर याने अनेक बॉलिवूड मॉडेल आणि अभिनेत्रींवर 20 कोटींहून अधिक खर्च केले आहेत. सध्या तो तुरुंगात आहे. जॅकलिन फर्नांडिस ही एक चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा :
Swatantra Veer Savarkar : रणदीप हुडाचा ‘वीर सावरकर’ चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला!