एक्स्प्लोर

Samrat Prithviraj : नव्या नावासह अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज! ‘या’ दिवशी सुरु होणार तिकीट बुकिंग

Samrat Prithviraj : यशराज फिल्म्सने शेअर केलेल्या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये नवीन शीर्षकासह चित्रपटातील मुख्य कलाकार देखील दिसत आहेत.

Samrat Prithviraj : या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) अभिनीत ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) चित्रपट शीर्षकावरून बराच काळ वादात अडकला होता. प्रचंड टीका आणि विरोधामुळे, निर्मात्यांनी नुकतेच या चित्रपटाचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. आता या ऐतिहासिक चित्रपटाचे नाव बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) करण्यात आल्याची माहिती निर्मात्यांनी नुकतीच दिली होती. अधिकृतपणे चित्रपटाचे शीर्षक बदलल्यानंतर, निर्मात्यांनी आता चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे.

यशराज फिल्म्सने शेअर केलेल्या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये नवीन शीर्षकासह चित्रपटातील मुख्य कलाकार देखील दिसत आहेत. वास्तविक, निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन शीर्षक जाहीर करण्यासाठी ‘सम्राट पृथ्वीराज’चे नवीन पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यासोबतच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगशी संबंधित एक महत्त्वाची माहितीही शेअर केली आहे.

पाहा पोस्टर :

शेअर केलेल्या या नवीन पोस्टरमध्ये अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरशिवाय अभिनेता संजय दत्त आणि सोनू सूद देखील दिसत आहेत. यासोबतच पोस्टरमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, या चित्रपटाची आगाऊ बुकिंग रविवारपासून सुरू होत आहे. या चित्रपटाची वाट पाहणारे चाहते-प्रेक्षक 29 मे पासून चित्रपटाचे आगाऊ बुकिंग करू शकतील. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारनेही याबाबत माहिती दिली. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर नवीन पोस्टर शेअर केले आहे.  

करणी सेनेने चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती. चित्रपटाच्या शीर्षकामुळे राजपूत समाज दुखावला गेल्याचे याचिकेत म्हटले होते. अशा परिस्थितीत, ‘पृथ्वीराज’ आणि YRF च्या निर्मात्यांनी राजपूत समाजाच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन चित्रपटाचे नाव पृथ्वीराजवरून बदलून ‘सम्राट पृथ्वीराज’ असे करण्यास सहमती दर्शवली.

कलाकारांची फौज!

चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार राजा पृथ्वीराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मानुषी छिल्लर संयोगिताच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अक्षय आणि मानुषीशिवाय या चित्रपटात सोनू सूद (Sonu Sood), संजय दत्त (Sanjay Dutt), आशुतोष राणा (Ashutosh Rana), मानव विज (Manav Vij), साक्षी तन्वर (Sakshi Tanwar), ललित तिवारी (Lalit Tiwari) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका दिसणार आहेत.

हेही वाचा :

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

June Movie Release : जून महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'पृथ्वीराज'पासून 'जुग जुग जिओ'पर्यंत बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 6 PM TOP Headlines | 6 PM 06 November 2024 | Headlines Marathi NewsTop 50 News : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMuddyache Bola | Jaysingpur | मुद्याचं बोला | जयसिंगपूरची जनता यड्रावकरांना पुन्हा संधी देणार?Sadabhau Khot  On Sharad Pawar : पवार तुमच्या चेहऱ्यासाखा महाराष्ट्र हवा का? जतमध्ये खोत बरळले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
PM Vidya Lakshmi Yojana : उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
Donald Trump : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
Embed widget