Sidhu Moose Wala : जाणून घ्या सिद्धू मुसेवाला यांचा जीवनप्रवास
Sidhu Moose Wala : पंजाबचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
![Sidhu Moose Wala : जाणून घ्या सिद्धू मुसेवाला यांचा जीवनप्रवास Punjabi singer Sidhu moose wala passed away in shoot out here is his profile Sidhu Moose Wala : जाणून घ्या सिद्धू मुसेवाला यांचा जीवनप्रवास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/29/6c400880488144d3f097d444f091f363_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sidhu Moose Wala Profile : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमुळे संगीतक्षेत्रासह मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त केला जात आहे. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांना ओळखले जायचे.
सिद्धू मुसेवाला यांचा जन्म कुठे झाला?
तरुणांचा आवडता गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांचा जन्म 11 जून 1993 रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील मुसा गावात झाला. एका पंजाबी कुटुंबात सिद्धू मुसेवाला जन्माला आले होते. सिद्धू मुसेवाला यांच्या गाण्यात एक पंजाबी स्वॅग होता. सिद्धू मुसेवाला यांचे खरे नाव शुभदीप सिंह सिद्धू असे होते.
AK-47 बंदुकीने गोळीबार करतानाचा फोटो व्हायरल
फायरिंग रेंजवर AK-47 बंदुकीने गोळीबार करताना सिद्धू मुसेवाला स्पॉट झाले होते. गोळीबार करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर सिद्धू मुसेवाला यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. त्यावेळी सिद्धू मुसेवाला यांनी ते गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे फोटो असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
अभियांत्रिकीचे घेतले होते शिक्षण
सिद्धू मुसेवाला यांनी कॉलेजमध्ये असताना अनेक आंतरमहाविद्यालयीन गाण्यांच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. कॉलेजपासूनच सिद्धू मुसेवालाच्या गाण्याची शैली चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. सिद्धू मुसेवाला यांनी लुधियानाच्या गुरू नानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
रातोरात झाले स्टार
सिद्धू मुसेवाला यांनी गीतकार म्हणून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'लायसेन्स' असे त्याच्या पहिल्या गाण्याचे नाव होते. हे गाणं पंजाबी गायक निंजा यांनी गायले आहे. 'सो हाई' या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना लोकप्रियता मिळाली. या गाण्यामुळे सिद्धू मुसेवाला यांचे नाव जगभरात ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे सिद्धू रातोरात स्टार झाले. सिद्धू मुसेवाला यांच्या 'सो हाई' या गाण्याला यूट्यूबवर 477 मिलिअन व्हूयूज मिळाले आहेत.
संबंधित बातम्या
पंजाबमधील आप सरकारने काल सुरक्षा काढून घेतली, आज काँग्रेस नेते आणि गायक सिद्धू मुसेवालांची गोळ्या घालून हत्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)