Entertainment News Live Updates 25 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Tiger Nageswara Rao : रवी तेजाच्या 'टायगर नागेश्वर राव' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट
Tiger Nageswara Rao First Look Out : रवी तेजा (Ravi Teja) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा 'टायगर नागेश्वर राव' (Tiger Nageswara Rao) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. या अॅक्शनपटात गायत्री भारद्वाज (Gayathri Bharadwaj) आणि नुपूर सेननदेखील (Nupur Sanon) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आज निर्मात्यांनी 'टायगर नागेश्वर राव' या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट केला आहे.
Rama Raghav : रमा की राघव कोण देणार प्रेमाची कबुली? 'रमा राघव' मालिकेचा रंगणार विशेष भाग
Rama Raghav Marathi Serial Latest Update : 'रमा राघव' (Rama Raghav) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे. रघा आणि राघव एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. राघवमुळे रमाला नवीन आयुष्य मिळालं आहे. आता रमा आणि राघवपैकी प्रेमाची कबुली कोण देणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Shola Ambani : अंबानींची बातच न्यारी! थाटात पार पडला श्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम
Shloka Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी (Shloka Ambani) लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकताच श्लोकाच्या (Shloka Mehta) डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे.
Kiran Mane : सातारच्या बच्चनला मिळाली नवी मालिका; 'बिग बॉस'नंतर आता पुन्हा गाजवणार छोटा पडदा
Kiran Mane New Marathi Serial : अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यांमध्ये किरण मानेचं (Kiran Mane) नाव घेतलं जातं. आजवर त्यांनी अनेक मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss) चौथं पर्वदेखील त्यांनी चांगलच गाजवलं आहे. सातारचा बच्चन म्हणून ते लोकप्रिय आहेत. 'मुलगी झाली हो' या मालिकेतील वादामुळे किरण माने चर्चेत आला होता. या मालिकेतून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला. पण 'बिग बॉस'द्वारे त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता किरण पुन्हा एकदा एका नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
Cannes Film Festival : कौतुकास्पद! अनुराग कश्यपच्या 'कॅनेडी'ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालं 'स्टँडिंग ओव्हेशन'
Cannes Film Festival : जगभरातील सिनेप्रेमींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' ची सुरुवात (Cannes Film Festival 2023) 16 मे पासून झाली आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी वॉक केला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) 'कॅनेडी (Kennedy)' चित्रपटाचा प्रीमियर पार पडला आहे. अनुरागच्या या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'स्टँडिंग ओव्हेशन' मिळालं आहे. ही भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
View this post on Instagram
Sara Ali Khan: सारा अली खाननं रिक्षानं केला प्रवास; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'रिक्षावाल्याला पैसे...'
Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही सध्या तिच्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये सारा आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात सारा आणि विकीची जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. बुधवारी (24 मे) रात्री विकी आणि सारा हे मुंबईत या चित्रपटाचे प्रमोशन करत होते. प्रमोशननंतर घरी परतण्याची वेळ आली तेव्हा साराची कार कार्यक्रमाच्या ठिकाणी आली नाही. त्यामुळे सारानं रिक्षामधून प्रवास केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सारा ही रिक्षानं प्रवास करताना दिसत आहे.
View this post on Instagram
Rocky Aur Rani Ki Prem Kahani:'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ची रिलीज डेट जाहीर; आलिया आणि रणवीरच्या लूकनं वेधलं लक्ष
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. फिल्ममेकर करण जोहरच्या या चित्रपटाची रिलीज डेट आज जाहीर करण्यात आली आहे. करण जोहर, आलिया भट्ट आणि रणबीर सिंह यांनी सोशल मीडियावर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील रणवीर आणि आलिया यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
Milind Gawali: 'आई कुठे काय करते' मालिकेतील मिलिंद गवळींनी लेकीसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाले, 'लेकी बरोबर पुण्यात जाऊन गप्पा...'
Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये अनिरुद्ध ही भूमिका साकरतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. मिलिंद हे वेगवेगळ्या विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी त्यांची लेकीसाठी म्हणजेच मिथिला गवळीसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
View this post on Instagram
The Bageshwar Sarkar: 'द बागेश्वर सरकार' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कोण साकारणार भूमिका? कुठे होणार शूटिंग? दिग्दर्शक म्हणाले...
The Bageshwar Sarkar: मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे (Bageshwer Dham) धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) हे नेहमी चर्चेत असतात. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pt. Dhirendra Krishna Shastri) यांचा दरबार भरतो. धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता धीरेंद्र शास्त्री यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'द बागेश्वर सरकार' असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकत्याच एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.