एक्स्प्लोर

The Bageshwar Sarkar: 'द बागेश्वर सरकार' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कोण साकारणार भूमिका? कुठे होणार शूटिंग? दिग्दर्शक म्हणाले...

धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'द बागेश्वर सरकार' असं या चित्रपटाचं नाव आहे.

The Bageshwar Sarkar: मध्यप्रदेशातील बागेश्वर धामचे (Bageshwer Dham)  धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri)  हे नेहमी चर्चेत असतात.  बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pt. Dhirendra Krishna Shastri) यांचा दरबार भरतो.  धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.  धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या विविध विषयांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता धीरेंद्र शास्त्री यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'द बागेश्वर सरकार' असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकत्याच एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. 
 
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक विनोद तिवारी यांनी सांगितलं की, बागेश्वर बाबा यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनवण्यासाठी स्वतः  बाबांनी (बागेश्वर बाबा)  आशीर्वाद दिला आहेत. बागेश्वर सरकार (बागेश्वर बाबा) यांच्याशी  सल्लामसलत करूनच चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. ही स्क्रिप्ट आता 90 टक्क्यांपर्यंत लिहिली गेली आहे.

कुठे होणार चित्रपटाचं शूटिंग? 


पुढे विनोद तिवारी यांनी सांगितलं की,चित्रपटाचे शूटिंग छतरपूर, भोपाळ, मध्य प्रदेश आणि देशाच्या विविध भागात होणार आहे. तसेच या चित्रपटाचा काही भाग लंडनमध्येही शूट करण्यात येणार आहे.

चित्रपटात कोण साकारणार भूमिका?

विनोद तिवारी पुढे  म्हणाले, 'या चित्रपटात बाबा बागेश्वर हे काम करणार नाहीयेत. चित्रपटातील बाबा बागेश्वर सरकार आणि इतर भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची माहिती नंतर जाहीर केला जाईल.'

चित्रपटाचे शूटिंग कधी सुरु होणार? 


''द बागेश्वर सरकार'या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी सुरू होणार असून पुढील वर्षी हिंदी, इंग्रजी आणि भारतातील इतर अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. मी  बागेश्वर बाबा यांचा  शिष्य असल्याने कोरोनाच्या काळात मी बाबांसमोर चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता,गेल्या वर्षभरापासून चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.', अशी माहिती विनोद तिवारी  यांनी मुलाखतीमध्ये दिली.  या चित्रपटात बाबा बागेश्वर यांच्या बालपणातील संघर्षापासून ते जगभरात लोकप्रिय होण्यापर्यंतची कथा दाखवण्यात येणार असल्याचे  विनोद तिवारी यांनी सांगितले.

बागेश्वर  बाबांबद्दलचे वाद, त्यांच्यावर ढोंगी असल्याचा आरोप, हे सर्व या चित्रपटात काही दाखवले जाईल का? असा प्रश्न विनोद यांना विचारण्याच आला. या प्रश्नाचं उत्तर देत  विनोद तिवारी म्हणाले की, 'सध्या या चित्रपटाविषयी फार काही खुलासा करू शकत नाही. त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.' विनोद तिवारी हे द कन्व्हर्जन, तबादला यांसारख्या चित्रपटाचे फिल्ममेकर आहेत. आता त्यांचा 'द बागेश्वर सरकार'हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

संबंधित बातम्या

Bageshwar Dham : 'बागेश्वर धाम'वर सिनेमा येणार; उलगडणार चमत्कारिक रहस्ये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget