एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 24 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 24 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरे अडकला विवाह बंधनात

Maharashtrachi Hasyajatra:  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या  छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला  प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात.  सध्या   ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील अभिनेता दत्तू मोरेची सोशल मीडियावर चर्चा होता आहे. दत्तू मोरे हा विवाह बंधनात अडकला आहे. दत्तूनं नुकतेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Armaan Malik Chain Snatching: युट्यूबर अरमान मलिकसोबत घडली घटना; गळ्यातील चेन हिसकावून फरार झाले चोर

Armaan Malik Chain Snatching: युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik)  हा नेहमी चर्चेत असतो.  गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिक हा अडचणींचा सामना  करत आहे. अरमानची  पत्नी आणि त्याच्या मुलांची तब्येत खराब झाली होती. आता अरमान मोठं नुकसान झालं आहे. त्याच्यासोबत चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे. अरमानची चेन चोरीला गेली आहे. 

पहिल्या दोन सीझनमध्ये गायकवाड हे पात्र केंद्रस्थानी होतं. सत्तेसाठी प्रियजनांची हत्या किंवा मुलीने वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजकारणात केलेला प्रवेश असो, या सर्व गोष्टी प्रेक्षकांनी पहिल्या दोन सीझनमध्ये पाहिल्या आहेत. पण आता तिसऱ्या सीझनमध्ये जगदीश गुरव आपली इच्छा व्यक्त करताना दिसणार आहेत. 

City Of Dreams 3 : साम दाम दंड भेद... 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!

City Of Dreams Season 3 : 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' (City Of Dreams) या सीरिजचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत. आता या बहुचर्चित सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने सीरिजबद्दलची त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सत्तेसाठीचा संघर्ष प्रेक्षकांना या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. स्वप्नांच्या नगरीवर राज्य करण्यात कोण कशापद्धतीने यशस्वी होतं हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

Sheezan Khan : तुनिषा शर्माच्या निधनानंतर शीझान खान पुन्हा अलीबाबाच्या भूमिकेत

Sheezan Khan KKK 13 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शीझान खान (Sheezan Khan) सध्या रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमाचं शूटिंग करत आहेत. सध्या तो दक्षिण आफ्रिकेत आहे. सहस्पर्धकांसोबतचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतचं त्याने अलीबाबाच्या कॉस्ट्यूममधले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

15:39 PM (IST)  •  24 May 2023

Tiger Nageswara Rao : रवी तेजाच्या 'टायगर नागेश्वर राव' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट

Tiger Nageswara Rao First Look Out : रवी तेजा (Ravi Teja) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा 'टायगर नागेश्वर राव' (Tiger Nageswara Rao) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. या अॅक्शनपटात गायत्री भारद्वाज (Gayathri Bharadwaj) आणि नुपूर सेननदेखील (Nupur Sanon) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आज निर्मात्यांनी 'टायगर नागेश्वर राव' या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट केला आहे. 

वाचा सविस्तर

View this post on Instagram
 
A post shared by RAVI TEJA (@raviteja_2628)

14:47 PM (IST)  •  24 May 2023

Rama Raghav : रमा की राघव कोण देणार प्रेमाची कबुली? 'रमा राघव' मालिकेचा रंगणार विशेष भाग

Rama Raghav Marathi Serial Latest Update : 'रमा राघव' (Rama Raghav) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे. रघा आणि राघव एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. राघवमुळे रमाला नवीन आयुष्य मिळालं आहे. आता रमा आणि राघवपैकी प्रेमाची कबुली कोण देणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Rama Raghav : रमा की राघव कोण देणार प्रेमाची कबुली? 'रमा राघव' मालिकेचा रंगणार विशेष भाग

13:22 PM (IST)  •  24 May 2023

Shola Ambani : अंबानींची बातच न्यारी! थाटात पार पडला श्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम

Shloka Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी (Shloka Ambani) लवकरच आई-बाबा होणार आहेत. नुकताच श्लोकाच्या (Shloka Mehta) डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Isha Ambani Piramal✨ (@_ishaambanipiramal)

12:49 PM (IST)  •  24 May 2023

Kiran Mane : सातारच्या बच्चनला मिळाली नवी मालिका; 'बिग बॉस'नंतर आता पुन्हा गाजवणार छोटा पडदा

Kiran Mane New Marathi Serial : अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यांमध्ये किरण मानेचं (Kiran Mane) नाव घेतलं जातं. आजवर त्यांनी अनेक मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss) चौथं पर्वदेखील त्यांनी चांगलच गाजवलं आहे. सातारचा बच्चन म्हणून ते लोकप्रिय आहेत. 'मुलगी झाली हो' या मालिकेतील वादामुळे किरण माने चर्चेत आला होता. या मालिकेतून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला. पण 'बिग बॉस'द्वारे त्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता किरण पुन्हा एकदा एका नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 

वाचा सविस्तर

View this post on Instagram
 
A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

10:55 AM (IST)  •  24 May 2023

Nitesh Pandey Death : मनोरंजनविश्वावर पुन्हा शोककळा! 'अनुपमा' फेम अभिनेता नितेश पांडेचं निधन

Nitesh Pandey Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget