एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 22 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 22 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Ajay Devgn : 'भोला'साठी अजय देवगणने किती घेतलं मानधन?

Ajay Devgn : 'भोला' या सिनेमात अजय देवगणचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. सध्या अजय या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत असून या सिनेमासाठी त्याने 30 कोटी मानधन घेतलं आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabu) या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून या सिनेमासाठी तिने चार कोटी मानधन घेतलं आहे. तसेच संजय मिश्राने या सिनेमासाठी 85 लाख आकारले आहेत. अभिषेक बच्चनची झलकदेखील या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून त्याने एक कोटी मानधन घेतलं आहे. 

Chetan Kumar Arrested : कन्नड अभिनेता चेतन कुमारला पोलिसांनी केली अटक

Chetan Kumar Arrested : कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चेतन कुमारच्या (Chetan Kumar) अडचणीत वाढ झाली आहे. हिंदू धर्माबद्दल केलेलं वादग्रस्त ट्वीट अभिनेत्याला महागात पडलं आहे. चेतन कुमारला बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम येथील पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू धर्म खोटेपणावर आधारित असल्याचं ट्वीट चेतन कुमारने केलं होतं. 

Dharmendra : वयाच्या 87 व्या वर्षी धमेंद्र रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज

Dharmendra Comeback : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत जोरदार कमबॅक केलं आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमात धर्मेंद्र महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. धर्मेंद्र यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. बॉबी देओलदेखील (Bobby Deol) आपल्या वडिलांचा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहे. याबद्दल बोलताना बॉबी देओल म्हणाले, "बाबा जेव्हा सिनेमाच्या शूटिंगसाठी घराबाहेर जातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक असते. त्यांच्या सिनेमाची मी वाट पाहतोय."

19:41 PM (IST)  •  22 Mar 2023

Sonu Nigam : गायक सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी

Sonu Nigam : गायक सोनू निगमच्या वडिलांच्या ओशिवरा येथील घरी चोरी झाली आहे. बेडरूमच्या डिजिटल लॉकरमधून सुमारे 72 लाख रुपये चोरीला गेले आहेत

17:21 PM (IST)  •  22 Mar 2023

Bageshwar Dham : बागेश्वर धामवर सिनेमा येणार; उलगडणार चमत्कारिक रहस्ये

Bageshwar Dham Movie : मध्यप्रदेशातील 'बागेश्वर धाम' (Bageshwar Dham) हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बागेश्वर धाममध्ये पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Pt. Dhirendra Krishna Shastri) यांचा दरबार भरतो. धीरेंद्र शास्त्री हे बागेश्वर धाममध्ये येणाऱ्या भाविकांचं मन वाचता येत असल्याचा दावा करतात. बागेश्वर धामची चमत्कारिक शक्ती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. आता या बागेश्वर धामवर (Bageshwar Dham Movie) सिनेमा येणार आहे. 

16:31 PM (IST)  •  22 Mar 2023

Shilpa Shetty : दाक्षिणात्य सिनेसृष्टीत झळकण्यासाठी शिल्पा शेट्टी सज्ज!

Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या शिल्पाने एकापेक्षा एक सिनेमांत काम करत प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यास शिल्पा सज्ज आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

13:11 PM (IST)  •  22 Mar 2023

Bawaal Release Date : वरुण धवन-जान्हवी कपूरच्या 'Bawaal' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Janhvi Kapoor Varun Dhawan Bawaal Release Date Announced : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) 'बवाल' (Bawaal) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Earthsky Pictures (@earthskynotes)

12:42 PM (IST)  •  22 Mar 2023

Gudi Padwa 2023 : अमिताभ बच्चन ते हेमा मालिनी; बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!

Gudi Padwa 2023 : चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. आज सर्वत्र गुढीपाडव्याच्या उत्साह पाहायला मिळत आहे. आनंदाची, सुखसमृद्धी आणि भरभराटीची गुढी आज घरा-घरांत उभारली जात आहे. अशातच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनपासून (Amitabh Bachchan) ते हेमा मालिनीपर्यंत (Hema Malini) अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना पुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Gudi Padwa 2023 : अमिताभ बच्चन ते हेमा मालिनी; बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget