एक्स्प्लोर

Nikamma Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर शिल्पा शेट्टीचा 'निकम्मा' जोरदार आपटला, शो झाले रद्द

Nikamma : 'निकम्मा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने प्रेक्षकांची चांगलीच निराशा केली आहे.

Nikamma Box Office Collection : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि आग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू देसानीचा (Abhimanyu Dassani) 'निकम्मा' (Nikamma) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. सिनेमा चांगली कमाई करत नसल्याने निर्मात्यांनी या सिनेमाचे अनेक शो रद्द केले आहेत. 

कशी होती 'निकम्मा'ची कमाई?

'निकम्मा' हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 51 लाखांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 जूनला या सिनेमाने 48 लाखांचा गल्ला जमवला आहे. तर 19 जूनला या सिनेमाने 52 लाखांची कमाई केली आहे. अशाप्रकारे तीन दिवसांत या सिनेमाने 1.5 कोटींची कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

अभिमन्यू दसानीचा 'निकम्मा' सिनेमा 1250 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा 2017 साली प्रदर्शित झालेल्या 'अबाई' या तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे. अभिमन्यूने 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'मर्द को मर्द' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 

'निक्कमा'चे कथानक काय?

अभिमन्यु दसानी याच्या आयुष्यात जेव्हा शिल्पाची एन्ट्री होते, तेव्हा त्याच्या आयुष्यात काय बदल होतात? तो कसा बदलतो? हे सर्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. शिल्पा ही या चित्रपटामध्ये सुपरवुमनच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, अभिमन्यु दासानी यांच्यासोबतच शर्ली सेटीया, सुनील ग्रोवर आणि समीर सोनी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. शर्ली आणि अभिमन्यु यांचा रोमँटिक अंदाज या सिनेमात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

‘निकम्मा’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. या सिनेमात शिल्पा शेट्टीसह अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया यांच्याही मुख्य भूमिका आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 2022 या वर्षातील हा सातवा चित्रपट आहे, ज्याने 1 कोटींपेक्षा कमी व्यवसाय केला आहे.

संबंधित बातम्या

Nikamma Box Office Collection : शिल्पा शेट्टीच्या चित्रपटाने केली चाहत्यांची निराशा, पहिल्या दिवशी अवघी ‘इतकी’च कमाई!

Nikamma Trailer Out : 'निकम्मा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; शिल्पा आणि अभिमन्यु प्रमुख भूमिकेत

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
Embed widget