एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 22 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 22 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो पुन्हा रद्द

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा बंगळुरू येथे होणारा शो रद्द करण्यात आला आहे. मुनव्वरच्या 'डोंगरी टू नोव्हेअर' या शोला पोलिसांनी मान्यता न दिल्याने हा शो रद्द करण्यात आला आहे. पोलिसांची परवानगी न मिळाल्याने कार्यक्रम रद्द करण्याची ही दुसरी वेळ आहे.

चिरंजीवीच्या 'गॉडफादर'चा टीझर आऊट

सध्या अनेक दाक्षिणात्य सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या सिनेमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. चिरंजीवीचा 'गॉडफादर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'गॉडफादर' हा सिनेमा 'लूसिफर' या ब्लॉकबस्टर मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे.

हृतिक रोशनच्या 'महाकाल की थाली'च्या जाहिरातीच्या वादात झोमॅटोने मागितली माफी

माफी मागून झोमॅटो कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, जाहिरातीमध्ये बोललेल्या महाकाल की थाली या शब्दाचा अर्थ 'महाकाल रेस्टॉरंट'चा होता, महाकालेश्वर मंदिराचा नव्हता. वास्तविक, झोमॅटोच्या या नव्या जाहिरातीत हृतिकने म्हटले आहे की, "मला भूक लागली होती म्हणून महाकालकडून थाळी मागवत आहे." या जाहिरातीत महाकालेश्वर मंदिराच्या नावाने हृतिक रोशनच्या जाहिरातीवरून गदारोळ झाला होता. हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

'देवमाणूस 2' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

'देवमाणूस' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. 'देवमाणूस 2' मालिकेत येणारे नव-नवे ट्विस्ट प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करत असतात. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे 'देवमाणूस 2' मालिकेचा चाहतावर्ग नाराज झाला आहे.

हजर होण्यासाठी रणवीरने पोलिसांकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली

न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह उद्या (22 ऑगस्ट) चौकशीसाठी मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहू शकणार नाही. त्याने याबाबत पोलिसांना कळवलं असून हजर राहण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. आता चेंबूर पोलीस नवीन तारीख निश्चित करुन नवा समन्स पाठवतील. अभिनेता रणवीर सिंहने 'पेपर' या मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. मात्र त्याला हे फोटोशूट चांगलंच महागात पडल्याचं चित्र आहे.

20:21 PM (IST)  •  22 Aug 2022

Takatak 2 : 'टकाटक 2'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; पहिल्या वीकेंडला केली 2.11 कोटींची कमाई

Takatak 2 : मराठी प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा 'टकाटक' मनोरंजनाचा खजिना खुला झाला आहे. मराठी तिकिटखिकडीवर प्रेक्षक 'टकाटक' मनोरंजनाची जादू अनुभवत आहेत. 'टकाटक 2' (Takatak 2) या मराठी सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यश मिळवलं आहे. याच बळावर 'टकाटक 2'च्या खात्यावर पहिल्या वीकेंडला तब्बल 2.11 कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 18 ऑगस्ट रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच प्रेक्षक गर्दी करत आहेत.

17:41 PM (IST)  •  22 Aug 2022

'पुष्पा 2'च्या शूटिंगला सुरुवात

'पुष्पा द रुल' या सिनेमाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे. 'पुष्पा: द रूल' या सिनेमात 'पुष्पा: द राइज' प्रमाणेच प्रेक्षकांना नाट्य, अॅक्शन आणि थ्रिल बघायला मिळणार आहे. 'पुष्पा: द रूल' या सिनेमाची निर्मिती 500 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात येणार आहे. निर्माते या सिनेमाच्या प्रमोशनसाठी 500 कोटी खर्च करणार आहेत. हा सिनेमा 10 भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याने प्रेक्षक 'पुष्पा: द रूल'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच सिनेमागृहात 'पुष्पा: द रूल' हा सिनेमा धमाका करणार आहे. 

17:01 PM (IST)  •  22 Aug 2022

Jailer : सुपरस्टार रजनीकांतच्या 'जेलर'चे फर्स्ट पोस्टर आऊट

Jailer : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'जेलर' (Jailer) असे या सिनेमाचं नाव आहे. नेल्सन मंडेलाने (Nelson Mandela) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचे शूटिंग सुरू झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. अशातच आज या सिनेमाचे फर्स्ट पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

16:44 PM (IST)  •  22 Aug 2022

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीनं शेअर केला खास व्हिडीओ: वील चेअरवर केला योगा

View this post on Instagram
 
A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

16:24 PM (IST)  •  22 Aug 2022

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2'ने सिनेमागृहात रोवला यशाचा झेंडा

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2' (Daagdi Chawl 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. चंद्रकांत कणसे (Chandrakant Kanse) दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या सिनेमाने सिनेमागृहात यशाचा झेंडा रोवला आहे. तीन दिवसांत या सिनेमाने दोन कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, 9 दिवसांनी पोलिसांना मोठं यश
बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, 9 दिवसांनी पोलिसांना मोठं यश
मरावे परी किर्तीरुपी उरावे....  रतन टाटांच्या अंत्यविधीला 24 तास उलटण्यापूर्वी कामगारांना दिवाळी बोनस
मरावे परी किर्तीरुपी उरावे.... रतन टाटांच्या अंत्यविधीला 24 तास उलटण्यापूर्वी कामगारांना दिवाळी बोनस
Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Krushi Vision : युवकांना खुणावतोय शेती स्टार्टअपचा पर्याय : ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Krushi Vision : शेतीचं भविष्य; भविष्यातली शेती आणि तंत्रज्ञान : ABP MajhaMajha Krushi Vision : बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतं धोरण? धनंजय मुंडे Exclusive : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, 9 दिवसांनी पोलिसांना मोठं यश
बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, 9 दिवसांनी पोलिसांना मोठं यश
मरावे परी किर्तीरुपी उरावे....  रतन टाटांच्या अंत्यविधीला 24 तास उलटण्यापूर्वी कामगारांना दिवाळी बोनस
मरावे परी किर्तीरुपी उरावे.... रतन टाटांच्या अंत्यविधीला 24 तास उलटण्यापूर्वी कामगारांना दिवाळी बोनस
Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
मोठी बातमी ! यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला बहुमान
मोठी बातमी ! यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर; निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला बहुमान
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Embed widget