एक्स्प्लोर

Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तिन्ही नराधम पोलिसांच्या ताब्यात, 9 दिवसांनी पोलिसांना मोठं यश

Bopdev Ghat Incident: आता अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पुणे: पुण्यातील बोपदेव घाटात रात्री आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका 21 वर्षीय तरुणीवर आणि तिच्या मित्रावर हल्ला केला. शस्त्राचा आणि लाकडी दांडक्यांचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असेलल्या वस्तू घेऊन तरूणाला झाडाला बांधून ठेवण्यात आलं तर तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या घटनेतील तीन आरोपी फरार होते, घटनेची सखोल चौकशी सुरु होती. आता अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्यांची सखोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे. 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 60 टीम पोलिसांनी तयार केल्या होत्या. मात्र घटनेच्या 9 दिवसानंतरही आरोपी मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात होता. आरोपींचे स्केच तयार केले आहेत. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. आतापर्यंत रेकॉर्डवरील 400 गुन्हेगारांची झाडझडती घेण्यात आली आहे. 

बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात नऊ दिवस उलटून गेले तरी पोलिसांना अजूनही आरोपींचा कुठलाही मागमूस लागत नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शहर पोलिसांच्या तब्ब्ल 60 टीम वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली आहे. बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असले असावेत असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलीस स्टेशनने प्रसिध्द केले होते. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलीसांनी आवाहन केले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit pawar On Cabinet Meeting : कॅबिनेट बैठकीतून अजित पवार १० मिनिटांत निघून गेले #abpमाझाBopdev Ghat Case Update : सीसीटीव्हीमध्ये सापडू नये यासाठी आपोरींकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्नSambhaji raje Chhtrapati : संभाजीराजेंच्याा नेतृत्वात महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विधानसभा लढवणारPune Bopdev Ghaat : बोपदेव घाट प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
रतन टाटांचा उत्तराधिकारी कसा निवडला, काय होते निकष?; टाटा ट्रस्ट बोर्डमधील इनसाइड स्टोरी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; महिला भगिनींना आणखी एक संधी
Nana Patole : 'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत', पुण्यात नाना पटोलेंचे झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
आधी उद्धव ठाकरे, नंतर शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीने गद्दारी केली, संभाजीराजेंचा हल्लाबोल, महायुतीसह मविआला सुनावलं
The Nobel Prize Nihon Hidankyo : हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
हिरोशिमा आणि नागासाकी अण्वस्त्र हल्ल्यात वाचलेल्यांचा अण्वस्त्रांविरोधात लढा! 'हिबाकुशां'च्या अविरत लढ्याला नोबेलच्या 'शांततेचं' कोंदण
Embed widget