एक्स्प्लोर

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 2'मध्ये पाहायला मिळणार डॅडी आणि सूर्यामधील संघर्ष, नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता!

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ 1'ला (Daagdi Chawl) प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

Daagdi Chawl 2 : 'दगडी चाळ' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर 'चुकीला माफी नाही' असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं'ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. 'दगडी चाळ 1'ला (Daagdi Chawl) प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटाचे नवं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसतोय.

‘डॅडी’ आणि ‘सूर्या’चे नाते आपण याआधीच पाहिले. 'डॅडीं'च्या गुंडांसोबत होणाऱ्या भांडणानंतर सूर्या-डॅडींची होणारी मांडवली, 'डोकॅलिटी' वापरून काम करणारा 'सूर्या' डॅडींचा उजवा हात बनला, त्यात सूर्याचा कौटुंबिक ताण, हे सगळं आपण यापूर्वी पाहिलं. मात्र, यावेळी 'आय हेट यू डॅडी' असे म्हणत, सूर्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसतोय, आता तो डॅडींचा तिरस्कार का करतोय?, याचे उत्तर 'दगडी चाळ 2' पाहिल्यावरच मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेते मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) 'डॅडीं'ची भूमिका साकारत आहेत. तर, अभिनेता अंकुश चौधरी ‘सूर्या’च्या भूमिकेत दिसणार आहे.

पाहा पोस्टर :

प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या 'दगडी चाळ'मधील 'चुकीला माफी नाही', असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली असून, मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ 2' (Daagdi Chaawl 2 ) हा चित्रपट येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे, हे नक्की!

बॉलिवूडमध्ये निर्माती म्हणून नावलौकिक मिळवल्यानंतर संगीता अहिर यांनी 'दगडी चाळ'च्या निमित्ताने मराठी चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता त्या 'दगडी चाळ'चा सिक्वेल घेऊन सज्ज झाल्या आहेत. चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्या संगीता अहिर म्हणतात की, ‘दगडी चाळ 2'च्या प्रदर्शनाची घोषणा करताना विशेष आनंद होत आहे. 'दगडी चाळ'ला प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही या चित्रपटाचा सिक्वेल करण्याचा विचार केला. प्रेक्षकांसोबतच मलाही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड रिलीज करण्याचा आमचा मानस आहे.’ 

हेही वाचा :

Happy Birthday Mrunal Thakur : छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात, आता बॉलिवूड गाजवतेय मृणाल ठाकूर!

Entertainment News Live Updates 1 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget