एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 2 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 2 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Dharmaveer : 'धर्मवीर' ठरला 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा; सिनेमाच्या टीमने मानले आभार

'धर्मवीर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. 'धर्मवीर' सिनेमा 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 50 दिवसदेखील पूर्ण झाले आहेत. त्यामुळेच सिनेमाच्या टीमने खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत

एक-दोन नव्हे तब्बल 22 कलाकारांसह हास्याचा बूस्टर डोस!

कोरोनाच्या दोन लसीनंतर हास्याचा एक बूस्टर डोस घेऊन ‘झोलझाल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे. प्रेक्षकांना मनमुरादपणे हसायला लावण्यास अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत आणि 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत निर्माते गोपाळ अग्रवाल निर्मित 'झोलझाल' हा चित्रपट आज सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील हास्याची मेजवानी किती रुचकर असणार, हे आपण चित्रटातील ठसकेदार गाण्यांनी आणि चित्रपटाचा ट्रेलरने पहिलीच आहे.

‘तारक मेहता...’मध्ये ‘नट्टू काकां’ची वापसी!

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील प्रेक्षकांचे लाडके पात्र ‘नट्टू काका’ साकारणारे अभिनेते ​​घनश्याम नायक यांच्या निधनाला आता नऊ महिने पूर्ण झाले आहेत. मालिकेचे चाहते आता ‘नट्टू काका’ या पत्राला खूप मिस करत आहेत. मात्र, आता लवकरच ‘नट्टू काका’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नट्टू काका’ या पात्रासाठी निर्मात्यांना नवीन अभिनेता सापडला आहे. गुजराती इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते किरण भट्ट आता या शोमध्ये नट्टू काकांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

एका एपिसोडसाठी करण जोहर घेतो तब्बल एक ते दोन कोटींचे मानधन

सिने निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करणचे चाहते या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. 7 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असला तरी आतापासूनच या कार्यक्रमाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी करण एक ते दोन कोटींचे मानधन घेतो.

'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली आहे. आज (30 जूनला) त्यांचा शपथविधी पार पडला. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील नव्या सरकारला शुभेच्छा देत आहेत. यात प्रसाद ओक, शरद पोंक्षे, आरोह वेलणकरसह अनेक कलाकारांचा सहभाग आहे. 'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

16:36 PM (IST)  •  02 Jul 2022

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवला पोलिसांनी पाठवली नोटीस; 20 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Rajpal Yadav Cheating Case : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) हा त्याच्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. राजपाल यादव  त्याच्या चित्रपटामधील अभिनयामुळे चर्चेत असतो. पण सध्या राजपाल हा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. राजपाल यादव याच्यावर 20 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता इंदूर पोलिसांनी त्याला नोटिस पाठवली आहे. 

वाचा सविस्तर बातमी 

15:36 PM (IST)  •  02 Jul 2022

Dunki : शाहरुखच्या 'डंकी'मध्ये तापसीची तापसीची वर्णी कशी लागली?; अभिनेत्रीनं सांगितला किस्सा

Taapsee Pannu With Shahrukh Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी चित्रफटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने  बघत आहेत. पाठाण, डंकी आणि जवान हे शाहरुखचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांपूर्वी डंकी या  चित्रपटाची शहारुखनं घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये तापसीनं शाहरुखसोबत काम करण्याबाबत आणि तिच्या या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत सांगितलं. Taapsee Pannu With Shahrukh Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी चित्रफटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने  बघत आहेत. पाठाण, डंकी आणि जवान हे शाहरुखचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांपूर्वी डंकी या  चित्रपटाची शहारुखनं घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये तापसीनं शाहरुखसोबत काम करण्याबाबत आणि तिच्या या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत सांगितलं

वाचा सविस्तर बातमी 

14:11 PM (IST)  •  02 Jul 2022

‘अरुंधती’चं मालिकेत कमबॅक, यश आणि ईशाला संकटातून बाहेर काढणार!

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या मालिकेत सध्या बरीच भावनिक गुंतागुंत पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कथानक आणखी उत्कंठावर्धक झालं आहे. मात्र, इतक्या सगळ्या घडामोडी घडत असताना मालिकेत अरुंधती कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे अरुंधतीने मालिका सोडली का? अशी विचारणा प्रेक्षकांकडून होत होती. मात्र, आता मालिकेत पुन्हा एकदा अरुंधतीचे कमबॅक झाले आहे.

सध्या मालिकेत मोठ्या घडमोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे अनघाचा जिन्यावरून पडून अपघात झाला आहे. तर, दुसरीकडे यशवर खुनाचा आरोप लागला आहे. आपल्या मुलांना या संकटांमधून बाहेर काढण्यासाठी अरुंधती पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात परतणार आहे.

वाचा संपूर्ण बातमी

13:23 PM (IST)  •  02 Jul 2022

‘वेक्ना’ अजूनही जिवंतच! प्रेक्षकांना आता ‘स्ट्रेंजर थिंग्स 5’ची वाट पाहावी लागणार!

Stranger Things Season 5 : नेटफ्लिक्सची लोकप्रिय वेब सीरिज ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चौथ्या सीझनच्या (Stranger Things Season 4) दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काल (1 जुलै) हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्स’च्या चौथ्या सीझनचा दुसरा भाग असल्याने ही सीरिज संपेल असे अनेकांना वाटले होते. मात्र, ‘वेक्ना’ अजून जिवंत असून आता त्याचा मृत्यू पाहण्यासाठी आणखी एका सीझनची वाट पाहावी लागणार आहे. आतुरतेने या भागाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची मात्र निराशा झाली आहे.

‘स्ट्रेंजर थिंग्स’ ही वेब सीरिज प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. या वेब सीरिजचे 4 सीझन आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत, ज्यामध्ये एकूण 34 एपिसोड आहेत. या सीरिजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्स’ ही एक अमेरिकन ड्रामा सीरिज असून, याची निर्मिती डफर ब्रदर्स नावाच्या प्रॉडक्शन हाऊसने केली आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्स’ ही सायन्स फिक्शन, हॉरर ड्रामा मालिका आहे. या सीरिजचा पहिला सीझन 15 जुलै 2016 रोजी रिलीज झाला होता. दुसरा सीझन ऑक्टोबर 2017मध्ये आला. तर, तिसरा सीझन जुलै 2019मध्ये रिलीज झाला होता. या नवीन वर्षात सीरिजचा चौथा सीझन दोन भागात विभागून रिलीज झाला आहे.

वाचा संपूर्ण बातमी

11:18 AM (IST)  •  02 Jul 2022

'लायगर'ची खास झलक, करण जोहरने शेअर केला विजय देवरकोंडाचा भन्नाट लूक!

'लायगर'ची खास झलक, करण जोहरने शेअर केला विजय देवरकोंडाचा भन्नाट लूक!

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 11 Oct 2024Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेशNew Delhi Dasra   राजधानी दिल्लीत रामलीला कमिटीकडून रावणदहनाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारीABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
बोपदेव घाटातील घटनेनंतर आरोपींनी अशी केली पोलिसांची दिशाभूल; सीसीटिव्हीत सापडू नये म्हणून आरोपींनी नेमकं काय केलं?
Embed widget