एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 18 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 18 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Bamboo: ‘बांबू’ चित्रपटाचा टीझर रिलीज

Bamboo: खरंतर प्रेमात पडलेल्यानंतर आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचा आनुभव अनेकांनी घेतला असेल. प्रत्येकानेच घेतला असेल. तुमचे गेलेले प्रेम यु टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे.  ‘बांबू’ (Bamboo) चित्रपटाचे टीझर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून येत्या 26 जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’च्या टीझरमध्ये तरूण -तरूणी बांबूच्या बनातून जाताना दिसत आहेत. अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात कलाकार नेमके कोण आहेत, हे जाणून घेण्याची आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. 

Jui Gadkari: ‘डिरेक्टर्स बॉक्स’; अभिनेत्री जुई गडकरीने दिग्दर्शकांना दिली अनोखी भेट

Jui Gadkari: स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. अर्जुन आणि सायली ही नवी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मालिकेच्या माध्यमातून कलाकार घराघरात पोहोचतात. मात्र या कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात तंत्रज्ञांसोबतच महत्त्वाची व्यक्ती असते आणि ती म्हणजे दिग्दर्शक. पडद्यामागे राहून सारी सूत्र हलवणारा हा अवलिया क्वचितच प्रेक्षकांसमोर येतो.

मालिकेला खऱ्या अर्थाने दिशा देणाऱ्या या दिग्दर्शकाविषयी वाटणारी आपुलकी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री जुई गडकरीने एक अनोखा मार्ग शोधला. ठरलं तर मग मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी जुईने सेटवर एक खास खाऊचा डबा आणला आहे. या खाऊच्या डब्याला ‘डिरेक्टर्स बॉक्स’ असं हटके नावही तिने दिलं आहे. सेटवर जुई दररोज नवनवे पदार्थ खाण्यासाठी घेऊन येत असते. दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी आणलेल्या या खाऊच्या डब्यातील खाऊ संपणार नाही याकडे जुईचं आवर्जून लक्ष असतं. 

Bigg Boss 16 : 'आजपासून बिग बॉस पाहणे बंद...', अब्दू रोजिकच्या घरातून निघून जाण्यावर चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया

Abdu Rozik Eviction Fans Reactions : छोट्या पडद्यावरील बिग बॉस 16 हा रिअॅलिटी शो सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या हा शो चर्चेत आहे तो ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोजिक या सदस्यामुळे. अब्दू हा या सीझनचा सर्वात लाडका स्पर्धक मानला जातो. त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की, या आठवड्यात अब्दूला वीकेंड का वारमध्ये बिग बॉसमधून बाहेर काढण्यात येणार आहे. सोशल मीडियावर या बातमीने अब्दूचे चाहते संतापले आहेत. 

17:04 PM (IST)  •  18 Dec 2022

Armaan Malik : दोन्हीही पत्नी प्रेग्नेंट असणाऱ्या युट्यूबरनं ट्रोलर्सला सुनावले खडे बोल, म्हणाला, 'मला फरक पडत नाही...'

Armaan Malik: गेल्या काही दिवसांपासून युट्यूबर अरमान मलिक  (Armaan Malik)  हा चर्चेत आहे. कृतिका आणि पायल या आरमानच्या दोन्ही पत्नी प्रेग्नंट आहेत. त्यामुळे सध्या अनेक नेटकरी अरमानला ट्रोल करत आहेत. नुकत्याच एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमाननं त्याच्या पत्नींच्या प्रेग्नेंन्सीवरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमानला ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अरमान मलिक म्हणाला, 'हजार लोक कमेंट करत असतात. लोक माझे व्लॉग बघतात. ज्यांचे विचार छोटे असतात ते अशा प्रकारचे निगेटिव्ह कमेंट्स करतात. मी माझ्या कुटुंबाचे कोणतेही फोटो शेअर करेल. ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट्समुळे मला काहीच फरक पडत नाही. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

16:26 PM (IST)  •  18 Dec 2022

Sath Sobat : 'साथ सोबत' चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर प्रदर्शित; मोहन जोशी, संग्राम समेळ प्रमुख भूमिकेत

Sath Sobat : 'साथ सोबत' (Sath Sobat) या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या 'साथ सोबत'च्या टिझरला नेटकऱ्यांकडून अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे यांनी 'साथ सोबत' या चित्रपटात काहीसं वेगळं कथानक सादर केल्याची जाणीव टिझर पाहिल्यावर होते. हा नवा कोरा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

14:23 PM (IST)  •  18 Dec 2022

Pathaan: 'बेशरम रंग नाही तर लोकांचे...'; अभिनेत्रीच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

Pathaan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या(Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं . हे गाणं रिलीज झाल्यानंतर काहींनी या गाण्याचं कौतुक केलं तर काहींनी या गाण्याला ट्रोल केलं. काही नेटकऱ्यांनी या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या बिकीनीच्या रंगावर आक्षेप घेतला. आता अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीनं (Suchitra Krishnamoorthi) एक ट्वीट शेअर करुन या गाण्याचं नाव न घेता गाण्याला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. 

13:14 PM (IST)  •  18 Dec 2022

Avatar 2 Box Office Collection: 'अवतार 2' नं केली छप्पर फाड कमाई; जाणून घ्या दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

Avatar 2 Box Office Collection: दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron) यांच्या  'अवतार' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 'अवतार 2'(Avatar 2) म्हणजेच 'अवतार द वे ऑफ वाटर' (Avatar The Way Of Water)  हा चित्रपट रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं ओपनिंग-डेला  चांगली कमाई केली असून दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन...

11:43 AM (IST)  •  18 Dec 2022

Devoleena Bhattacharjee: 'माझी मुलं हिंदू असणार की मुस्लिम हे...' ; ट्रोलरला देवोलीनानं दिलं सडेतोड उत्तर

Devoleena Bhattacharjee: छोट्या पडद्यावरील साथ निभाना साथिया (Saath Nibhanaya Saathiya) या कार्यक्रमातील गोपी बहु ही भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलीनाचा (Devoleena Bhattacharjee) नुकताच विवाह सोहळा पार पडला. 14 डिसेंबर रोजी देवोलीनानं जिम ट्रेनर शाहनवाजसोबत लग्नगाठ बांधली. देवोलीनानं सोशल मीडियावर  (Social Media)  तिच्या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर केले. काही नेटकऱ्यांनी देवोलीनाच्या फोटोला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या तर काही लोकांनी तिला ट्रोल केलं. आता एका नेटकऱ्यानं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन 'तुझी मुलं हिंदू असणार की मुस्लिम?' असा प्रश्न देवोलीनाला विचारला. या प्रश्नाला देवोलीनानं उत्तर दिलं आहे.  

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हरSanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होतीपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha Kesakar

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
Embed widget