Entertainment News Live Updates 15 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
इव्हेंटमध्ये बेशुद्ध पडलेल्या चाहतीच्या मदतीला धावला वरुण धवन
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) चाहता वर्ग मोठा आहे. वरुणचा भेडीया (Bhediya) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. वरुण आणि क्रिती हे सध्या भेडीया या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी क्रिती आणि वरुणनं जयपूरमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या इव्हेंटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
अभिनेत्री काजोलच्या (Kajol) ‘सलाम वेंकी’ (Salaam Venkey) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बालदिनाच्या निमित्तानं हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काजोलसोबतच विशाल जेठवा (Vishal Jethwa), राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि अहना कुमरा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री रेवती यांनी केलं आहे. ‘सलाम वेंकी’ च्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
'शाब्बास सुनबाई' आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला
गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आजपासून 'शाब्बास सुनबाई' (Shabbas Sunbai) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवाहाविरुद्ध हिंमतीने पोहू पाहणाऱ्या एका ध्येयवादी सूनेची म्हणजेच संजीवनीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. 'शाब्बास सुनबाई' ही मालिका कौटुंबिक आणि पारंपरिक प्रथा, विचार व रूढींना वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या सुनेची आहे. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या संजीवनीला आयुष्यात खूप काही साध्य करायचंय. त्यासाठी तिच्या बाबांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिलंय. तिच्या बाबांनी सतत तिच्या मनावर हेच बिंबवलं आहे की तिने सतत पहिलं यावं आणि सर्वोत्कृष्ट असावं. तिने तिच्या वडलांच्या स्वप्नाला आपलसं करत नेहमीच अभ्यासात अव्वल नंबर पटकावत स्वतःचं शैक्षणिक वर्षांत नाव कमावलं आहे.
Siddhaanth Vir Surryavanshi: 'मला तुमची आठवण येते...' सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट
Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झालं. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला. सिद्धांतनं वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नुकतीच सिद्धांतची मुलगी डिजा सूर्यवंशीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले. या पोस्टला सिद्धांतनं खास कॅप्शन देखील दिलं.
View this post on Instagram
Bipasha Basu : बिपाशाला मिळाला डिस्चार्ज
Bipasha Basu : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bipasha Basu) 12 नोव्हेंबर 2022 रोजी एका गोड मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोवरला (Karan Singh Grover) कन्यारत्न झाल्याने त्यांचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. अशातच आता बिपाशाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
View this post on Instagram
Shah Rukh Khan : शाहरुखनं उडवली रणबीरची खिल्ली
Shah Rukh Khan And Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दोन्ही सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेते आहेत. रणबीर नुकताच बाबा झाल्यामुळे सध्या चर्चेत आहे. तर दुसरीकडे शाहरुख त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. दोन्ही अभिनेते अनेकदा एकमेकांची टिंगल करताना दिसून येतात.
Swara Bhasker: 'त्या राक्षसाला...' श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया
Swara Bhasker: श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. दिल्लीतील (Delhi) मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. हे तुकडे त्यानं फ्रीजमध्ये ठेवले. आफताबनं केलेल्या या अमानुष हत्येवर देशभरातून संताप व्यक केला जात आहे. नुकतच अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिनं, हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे.' असं लिहिलं आहे.
NO WORDS for how horrifying, gruesome & tragic this case is. My heart goes out to this poor girl-awful betrayal by someone she loved & trusted. Hope police speedily conclude their investigation & hope this monster gets the harshest punishment he thoroughly deserves. #shradhha 💔 https://t.co/W4w10JjdDf
— Swara Bhasker (@ReallySwara) November 14, 2022
Yashoda Box Office Collection Day 4: देशातच नाही तर परदेशातही समंथाची हवा; 'यशोदा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?
Yashoda Box Office Collection Day 4: फक्त देशभरातीलच नाही तर परदेशातील सिनेमागृहात देखील यशोदा हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अमेरिकेमध्ये या चित्रपटानं 445 हजार डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर भारतामध्ये यशोदा चित्रपटानं सोमवारी (14 नोव्हेंबर) 1.35- 1.45 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटानं भारतामध्ये 12 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
#Yashoda's Indomitable Will gets Unstoppable Love Abroad💥
— Ramesh Bala (@rameshlaus) November 14, 2022
It's among the Top Grossers in USA (This Week) with $445K Gross🔥
Book Now▶️ https://t.co/rapPt5X6ne@Samanthaprabhu2 @varusarath5 @Iamunnimukundan @harishankaroffi @hareeshnarayan @krishnasivalenk @SrideviMovieOff pic.twitter.com/cuKDX9qFZT