Entertainment News Live Updates 15 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jun 2022 11:37 PM
Swayamvar Mika Di Vohti : मिका सिंह जोडीदार म्हणून कुणाची निवड करणार? लवकरच 'स्वयंवर मीका दी वोटी' कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला

Swayamvar Mika Di Vohti : बॉलिवूड गायक मिका सिंह (Mika Singh) त्याच्या लग्नासाठी उत्सुक आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबिय, मित्र आणि चाहते आनंदी झाले आहेत. मिका सिंहचा 'स्वयंवर मीका दी वोटी' (Swayamvar Mika Di Vohti) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमामुळे तरी मिकाला आयुष्याचा जोडीदार मिळेल अशी चाहत्यांकडून आशा व्यक्त केली जात आहे. 

B Praak Baby Death : "वडील म्हणून दु:ख वाटतयं...", बाळाचा जन्मत: मृत्यू झाल्यानंतर गायक बी प्राकची भावूक पोस्ट

B Praak Baby Death : भारतातील लोकप्रिय गायक बी प्राकच्या (B Praak) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. बी प्राक आणि मीरा बच्चन (Meera Bachan) दुसऱ्यांदा आई-वडील होणार होते. पण त्यांच्या बाळाचा जन्मत: मृत्यू झाला आहे. बी प्राकने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. 

कंगनाच्या 'धाकड'ची किंमत फक्त 2.58 कोटी, निर्मात्याचे 78 कोटी रुपये पाण्यात

Kangana Ranaut Dhaakad : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'धाकड' (Dhaakad) सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. 85 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. पण या सिनेमाने फक्त 2.58 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. 

बिग बॉस ते निवडणुकीच्या रणांगणात झळकणारा अभिजीत बिचुकलेची एन्ट्री किचन कल्लाकारच्या मंचावर, तृप्ती देसाईदेखील येणार

Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात. पण 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात अभिजित बिचुकले, तृप्ती देसाई आणि जयवंत वाडकर येणार आहेत. 

आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरुख खानची एन्ट्री; ट्रेलर आऊट

बॉलिबूडचा बादशाह शाहरुख खानचे (Shahrukh Khan) चाहते शाहरुखला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. किंग खान आता अयान मुखर्जीच्या (Ayaan Mukherji) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना शाहरुखची झलक पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

'लेकीनं डेटिंग साईटवर टाकली प्रोफाईल अन्...'; सुचित्रा कृष्णमूर्तीने केला गौप्यस्फोट

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (Suchitra Krishnamoorthi) आणि शेखर कपूर (Shekhar Kapur) 1997 साली लग्नबंधनात अडकले होते. तर 2006 साली त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सुचित्रा कृष्णमूर्तीच्या मुलीचे नाव कावेरी कपूर (Kaveri Kapur) असे आहे. कावेरी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. कावेरी सध्या तिच्या आईसोबत म्हणजेच सुचित्रा कृष्णमूर्तीसोबत राहते. नुकत्याच एका मुलाखतीत सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाली, माझ्या लेकीने डेटिंग साईटवर माझी प्रोफाईल टाकली होती".

इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य देशपांडे सरांसमोर उघडकीस; सानिका टाकणार मिठाचा खडा

'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य अखेर देशपांडेसमोर आले आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात देशपांडे सर इंद्राच्या घरी दीपूसाठी मागणी घालायला जाणार आहेत. 

Pushpa The Rule : प्रतीक्षा संपली; 'पुष्पा 2'च्या शूटिंगला होणार सुरुवात

Pushpa The Rule : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना लवकरच 'पुष्पा 2'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. 'पुष्पा द रूल' असे या सिनेमाचे नाव आहे. 

आता सेलिब्रिटींचे लग्न होणार जोरा; ‘बँड बाजा वरात’

Band Baaja Varaat : ‘झी मराठी’वरील ‘बँड बाजा वरात’ (Band Baaja Varaat) या कार्यक्रमाने अनेक नवं दाम्पत्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस अजून खास बनवला. आता या पर्वात प्रेक्षकांची लाडकी सेलिब्रिटी जोडपी सहभागी होणार आहेत. आपण नेहमी कलाकारांच्या लग्नाचा थाट फोटोज मधून पाहत आलो आहोत. पण, जर प्रत्यक्षात आपल्याला एका सेलिब्रिटी जोडप्याचं लग्न पाहायला मिळालं तर? हो.. आता हे शक्य आहे! नव्या ‘बँड बाजा वरात, सेलिब्रिटींच लग्न जोरात’ या कार्यक्रमामुळे हे शक्य होणार आहे.


वाचा सविस्तर बातमी 

नेटफ्लिक्सच्या नव्या 'स्क्विड गेम शो'ची घोषणा

Squid Game: The Challenge : 2021 मधील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज 'स्किड गेम' (Squid Game) ला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या दक्षिण कोरियन सीरिजचा लवकरच दुसरा सिझन रिलीज होणार आहे. पण आता नुकतीच  नेटफ्लिक्सनं (Netflix)  एक घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सचा स्क्विड गेम: द चॅलेंज (Squid Game: The Challenge) हा नवा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये एकूण 456 स्पर्धक सहभागी होणार आहेत. नेटफ्लिक्सच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करुन या नव्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. 


वाचा सविस्तर बातमी

'थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय..', 'दे धक्का 2'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

'थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय..', 'दे धक्का 2'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!


 





रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एक्स-गर्लफ्रेंडची एन्ट्री?

Brahmastra : सध्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. याआधी या चित्रपटाचा टीझर आणि गाणे रिलीज करण्यात आले असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट एक सायन्स फिक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया-रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna) आणि मौनी रॉय (Mouni Roy) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


मल्टीस्टारर या चित्रपटात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) एक कॅमिओ देखील दाखवण्यात येणार आहे. शाहरुख या चित्रपटात एका वैज्ञानिकाची भूमिका साकारणार आहे. मात्र, आता रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणही (deepika Padukone) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटात दीपिकाची छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप दीपिकाच्या टीमकडून किंवा निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


वाचा संपूर्ण बातमी

बॉक्स ऑफिसवरील यशानंतर 'भूल भुलैय्या-2' ओटीटीवर होणार रिलीज

Bhool Bhulaiyaa 2 OTT Release : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 175 कोटींचा टप्पा गाठला आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. लवकरच हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


वाचा सविस्तर बातमी

Hemangi Kavi : हेमांगीची पोस्ट पुन्हा चर्चेत

Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. मंगळवारी (14 जून)  वटपौर्णिमेच्या निमित्तानं  हेमांगीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये हेमांगीनं तिचे खास फोटो शेअर केले. या फोटोला हेमांगीनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.


हेमांगीची पोस्ट :





किम कर्दाशियनने परिधान केलेल्या मर्लिन मुन्रोंच्या ड्रेसचं मोठं नुकसान

Kim Kardashian : नुकत्याच झालेल्या Met Gala 2022मध्ये अनेक कलाकारांनी आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. मात्र, जेव्हा किम कर्दाशियन (Kim Kardashian) रेड कार्पेटवर पोहोचली, तेव्हा तिला पाहून सगळेच थक्क झाले. किमने दिवंगत अभिनेत्री मर्लिन मुन्रो (Marilyn Monroe) यांचा 60 वर्ष जुना सुंदर गाऊन परिधान केला होता. यंदाच्या वर्षी मेट गाला 2022मध्ये मॉडेल-अभिनेत्री किम कर्दाशियनने हॉलिवूड स्टार मर्लिन मुन्रोचा 60 वर्ष जुना गाऊन परिधान करून लोकांचे लक्ष आकर्षित करून घेतले होते. मात्र, किम कर्दाशियनने परिधान केलेला हा गाऊन आता खराब झाला आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम कर्दाशियनने परिधान केल्यानंतर हा गाऊन खराब झाल्याचे बोलले जात आहे. या 60 वर्ष जुन्या आयकॉनिक गाऊनचे अनेक क्रिस्टल्स बाहेर आले आहेत आणि काही धाग्यांवर लटकलेले दिसत आहेत. तर, काही धागेही तुटल्याचे बोलले जात आहे.


वाचा संपूर्ण बातमी

अभिनेता करणवीर बोहराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Karanvir Bohra : अभिनेता मनोज महेंद्रकुमार बोहरा उर्फ ​​करणवीर बोहरा (Karanvir Bohra) याच्यासह सहा जणांविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणवीर बोहरावर ओशिवरा भागात राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेकडून 1 कोटी 99 लाख रुपये घेऊन ते परत न केल्याचा आरोप आहे. ही महिला गारमेंटचा व्यवसाय करते. 


वाचा सविस्तर बातमी  

स्वराचा होणार स्वराज, ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत नवा ट्विस्ट!

Tuzech Mi Geet Gaat Aahe : स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत. लवकरच मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्वराने आपल्या आईला गमावलं. आईचं छत्र हरपल्यानंतर आता स्वरा आपल्या बाबांच्या शोधात निघाली आहे. मात्र, तिचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. बाबांना शोधण्याच्या या प्रवासात सर्वात मोठी अडसर आहे ती म्हणजे स्वराची मामी. याच कारणामुळे स्वराला आपल्या केसांना कैची लावावी लागणार आहे.


वेश बदलून स्वरा आता आपल्या बाबांचा शोध घेणार आहे. याच कारणास्तव स्वराने आता स्वराज हे रूप धारण केलं आहे. स्वराला तिचे बाबा भेटणार का?, हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये कळणार आहे.

‘तारक मेहता...’मध्ये ‘दया भाभी’ परतली, पण...

Taarak Mehta Ka Ooltah chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah chashmah) या मालिकेचे सगळेच चाहते दया भाभीच्या एन्ट्रीसाठी प्रचंड उत्सुक होते. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दया गोकुळधाम सोसायटीमध्ये परतताना दाखवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दयाबेन गोकुळधाममध्ये येत असल्याचं बोललं जात होतं. पण, त्यानंतर सुंदर पुन्हा नवी योजना बनवतोय हे ऐकून चाहत्यांना शंका आली आणि त्यांची शंका खरी ठरली. पुन्हा एकदा प्रेक्षकांची निराशा झाली आहे. कारण, दयाबेनचे पुनरागमन पुन्हा एकदा लांबणीवर गेले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


देव कधीही चुकत नसतो, तो जादू करतो...बहुचर्चित 'अनन्या'चा टीझर प्रदर्शित


बहुचर्चित अनन्या हा सिनेमा आता 22 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे अनन्या हे पात्र साकारत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून हृता दुर्गुळे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर


'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'कौन बनेगा करोडपती'नंतर 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दुसऱ्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची कन्या पद्मश्री सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत.


शक्ती कपूर यांच्या मुलाची जामिनावर सुटका


अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली होती. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत हजर होता. त्यांची वैद्यकिय चाचणी केल्यानंतर त्या सर्वांनी ड्रग्सचे सेवन केल्याचं निष्पन्न झालं. आता  सिद्धांत आणि आणि इतर चार जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांना यापुढे जेव्हा बोलावले जाईल तेव्हा पोलिसांसमोर हजर राहावे लागेल' अशी माहिती डीसीपी पूर्व बेंगळुरू भीमा शंकर गुलेद यांनी दिली आहे.


सलमानला धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू: सूत्रांची माहिती


काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमानला हे धमकीचं पत्र देण्यामागे बिश्नोई गँगचा खंडणीचा हेतू होता, अशी माहिती गृहविभागाच्या सूत्रांनी दिली आहे.


'क्रिमिनल जस्टिस'च्या तिसऱ्या सीझनचा टीझर रिलीज


ओटीटी विश्वात पंकज त्रिपाठीचे नाव महत्त्वाचे मानले जाते. पंकजने अनेक लोकप्रिय वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. त्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. पंकजच्या एक वेबसीरिजचा सीझन संपल्यानंतर दुसरा सीझन येईपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागते. आता पंकजच्या 'क्रिमिनल जस्टिस' या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.